ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमृत 2.0 अंतर्गत घुग्घुस नगरपरिषदेच्या 7.07 कोटींच्या सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पास मंजुरी

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश

चांदा ब्लास्ट

 आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत घुग्घुस नगरपरिषदेच्या 7 कोटी 7 लाखांच्या सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी घुग्घुस शहराच्या सर्वांगीण, नियोजित व शाश्वत विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

            या प्रकल्पाच्या माध्यमातून घुग्घुस शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेचे सर्वंकष नूतनीकरण व सुधारणा करण्यात येणार असून संपूर्ण यंत्रणेची सखोल तपासणी, आवश्यक दुरुस्ती तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना दीर्घकालीन, सुरळीत व सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.

            घुग्घुस नगरपरिषदेच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार हे सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांच्या नेतृत्वामुळे शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दिशेने ही मोठी पायरी ठरणार आहे. सरोवर पुनरुज्जीवनामुळे पाणी साठवण क्षमता वाढणार असून पर्यावरण संतुलन राखण्यासही मोठी मदत होणार आहे. या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन, सहकार्य व पाठिंब्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी आभार व्यक्त केले आहेत.

ही विकासाची पायरी घुग्घुस शहराला नव्या उंचीवर नेणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून, भविष्यातही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी असेच भरीव उपक्रम राबविले जातील, केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानांतर्गत घुग्घुस नगरपरिषदेच्या सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पास मंजुरी मिळणे ही घुग्घुस शहरासाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. शहराच्या भविष्यातील पाणीटंचाई दूर करून नागरिकांना दीर्घकालीन, स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.

घुग्घुसच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असून, या प्रकल्पामुळे केवळ पाणीपुरवठाच नव्हे तर पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत विकासकामे मार्गी लावण्याचा आमचा संकल्प असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये