गोपनीय माहितीच्याआधारे चार महिला, एक पुरूष व तिन लहान बालक संशयास्पदरित्या फिरत असल्याची पोलिसांना माहिती
संबंधितांची विचारपुस ; विक्रीसाठी नेत असल्याचा कबुलनामा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
दि. १७/१२/२०२५ रोजी रात्रीचे चे १०.०० वा चे सुमारास वारही ग्राउंड होटल जवळ चार महीला, एक पुरूष व तिन लहान बालक संशयास्पद रित्या फिरत आहे अशी गोपनिय बातमीदाराने बातमी श्री. उमामहेश्वर राव पोलीस इन्स्पेक्टर भवानीपुरम यांना प्राप्त झाल्याने त्यांनी त्याचा पो स्टॉफ व सीडब्लु मेबंर याना सोबत घेवुन मिळालेल्या बातमीप्रमाणे घटनेठिकाणी जावुन संशयीत महीला व पुरुष यांना विचारपूस केली असता अगोदर उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने त्यांचे कडे सखोल विचारपुस केली असता.,
बालगाम सरोजीनी व विजयालक्ष्मी नावाचे एंजट मार्फतीने बेकायदेशीर रित्या लहान मुलांची विक्री करीत आहे आणि ज्या विवाहीत जोडप्यांना मुल बाळ नाहीत अश्याना पैसे देवुन बालकांची विक्री करीत आहे, मागील वर्षी त्यांनी हैदराबाद येथील नंदीनी सह एंजट चे माध्यमातुन दिल्ली येथील किरण शर्मा, भारती तसेच मुबंई येथील कविता, सतीष, नुरी यांनी बालके आणुन विदयाधरपुरम येथे ब्लेसी नावाचे महीलेच्या घरी कमीशन वर ठेवले व एंजट वली और सत्यनापा चे माध्यमातुन विक्री केले. अधीक विचारपुस करता माहीती दिली की विजयवाडा रेल्वे स्टेशन वर यांनी आज दि. १७/१२/२०२५ रोजी विक्रीदाराकडुन कमीशन वर वर महीला नामे किरण शर्मा व भारती रा. दिल्ली यांनी २५ दिवसांचे दोन बालकं व एजंट फरीना हिचेकडुन एक बालक त्यांना पुढे विक्री करीता ताब्यात दिले सदर ताब्यात असलेले तीन बालक पुढे विक्री करीता याठिकाणी चर्चा करीत होतो असे सांगीतले ताब्यात घेण्यात आलेल्या महीलांचे नावे १. बलगम सरोजीनी २. वडापल्ली ब्लेसी ३. गरीकामुक्का विजयालक्ष्मी ४. मुत्तीपेठा नंदीनी ५. शेख बाबा वली असे असुन उर्वरीत महीला आरोपी नामे किरण शर्मा व भारती अनिल दोन्ही रा. दिल्ली या काही वेळा पुर्वीच रेल्वे स्टेशन विजयवाडा येथे दोन बाळ आमचेकडे देवुन निघुन गेल्या आहेत
अशी माहीती दिल्याने श्री उमामहेश्वर राव पोलीस इन्स्पेक्टर भवानीपुरम यांनी पोलीस स्टेशन भवानीपुरम येथे दिलेल्या तक्रारीवरून अप क ५८४/२०२५ कलम १४३ (१) BNS,८१ J.J. ACT २०१५
प्रमाणे गुन्हा नोदं करण्यात आला असुन सदर गुन्हयात पळुन गेलेल्या महीला आरोपी नामे किरण शर्मा व भारती अनिल यांचे सीसीटीव्ही फुटेज मधील छायाचित्र सर्व रेल्वे स्थानकावर वितरीत करण्यात आले असता जिल्हा लोहमार्ग नागपुर मा. पोलीस अधिक्षक सो श्री मगेश शिंदे साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री दत्ताराम राठोड साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पांडुरंग सोनवणे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने साउथ कडुन येणा-या प्रत्येक ट्रेन मध्ये नमुद महीलांचा शोध घेण्याबाबत आदेशीत केल्याने प्रभारी अधिकारी स.पो.नि. पंकज ढोके यांचे निर्देशानुसार वर्धा रेल्वे पोलीस स्टेशन अतंर्गत बल्लारशहा दुरक्षेत्र येथे कार्यरत पो. हवा विजय मुंजेवार, पो. कॉ फटींग, दिनेश भावे, अजय मुन, चौधरी व म.पो.शि. कीर्ती मिश्रा तसेच साउथ सेन्ट्रल रेल्वे सुरक्षा बल चे उपनिरीक्षक श्री टी. लक्ष्मण तसेच प्रधान आरक्षक राजनारायण यांचे वेगवेगळे पथक नेमुन तसेच गोपनिय बातमीदारांना माहीती देवुन दक्षिणेकडुन येणा-या रेल्वे गाडया चेक केल्या असता.,
सदर गुन्हयातील महीला आरोपी नामे किरण शर्मा व भारती अनिल ट्रेन स्वर्णजयंती एक्स चे जनरल कोच मध्ये प्रवास करीत असतांना मिळुन आल्याने विजयवाडा येथील SIF सुब्रमण्यम यांना संशईत महीलेचे फोटो पाठवुन त्यांचेकडुन पाहीजे असलेल्या महीला आरोपी असल्याची खात्री करून घेण्यात आली तसेच नमुद महीला आरोपी कडे चौकशी केली असता त्यांनी दोन बालक दिल्ली येथुन आणुन विक्री करणे करीता विजयवाडा येथे दिल्याचे कबुल केले त्यावरून नमुद महीला हया सदर गुन्हयातीलच आरोपी असल्याचे निष्पन्न झालेवरून त्यांना नमुद गाडीतुन उतरवुन त्यांना महीला पो. अमलदार कीर्ती मिश्रा यांचे मदतीने ताब्यात घेवुन रेल्वे पोलीस चौकी बल्लारशाह येथे हजर करून नमुद महीला आरोपी बाबत श्री उमामहेश्वर राव पोलीस इन्स्पेक्टर भवानीपुरम यांना माहीती देण्यात आली असता पो.स्टे. भवानीपुरम येथील पोलीस स्टॉप बल्लारशाह चौकी येथे हजर आल्याने नमुद महीला आरोपी यांना पुढील तपास कामी त्यांचे ताब्यात देण्यात आले असुन नमुद गुन्हयाचा तपास पो.स्टे. भवानीपुरम हे करीत आहेत.



