ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुरगाव येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना: श्री गुरुदेव कार्यकर्त्यांचा सत्कार संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

       गोंडपिंपरी आष्टी मार्गावर असलेल्या सुरगाव या छोट्याशा गावात नव्याने श्रीगुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली तसेच या शाखेचे नोंदणीकृत प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.

       कार्यक्रमाचे उदघाटन मुख्याध्यापक अभय कासनगोट्टुवार यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे केंद्रिय सरचिटणीस ॲड.राजेंद्र जेनेकर, ज्येष्ठ प्रचारक लटारु मत्ते गुरूजी,ग्रामगीता परिक्षाप्रमुख सुभाष पावडे,तालुकाप्रमुख दिवाकर मंडरे,प्रचारप्रमुख विश्वास सूर,जवाहरनगर श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष बळीराम पाटील बोबडे,मानोलीचे अध्यक्ष मनोहर पासपुते,सचिव मारोती लोहे,भारीचे अध्यक्ष मोतीराम नागोसे,प्रचारक पांडुरंग शेंडे,प्रचारक अविनाश ठाकरे रामपूर,उद्धवराव झाडे आदींची उपस्थिती होती. सुरूवातीला गावात ग्रामसफाई करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रम स्थळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित भजनांचा कार्यक्रम गाव वेजगाव, फुरडीहेटी तसेच सभोवतालच्या पंचक्रोशीतील श्री गुरुदेव सेवक मंडळींनी सादर केला.

    प्रास्तविक सफल कोटनाके यांनी केले आणि आजवर गावात सुरू असलेल्या विविध उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला.

    श्रीगुरुदेव सेवा मंडळ सुरगावचे ग्रामसेवाधिकारी शंकर नेवारे,सचिव मुन्नाजी चुधरी व पदाधिकारी मंडळींना उपस्थितांचे हस्ते तालुक्यातील किरमीरी,काटली(बामणी),फुरडीहेटी या गावाचे मंडळाचे नोंदणीकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी एड. राजेंद्र जेनेकर यांनी राष्ट्रसंतांच्या विचारानुसार गावात अपेक्षित परिवर्तन याबाबत विचार मांडले तर लटारु मत्ते यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यपद्धती बाबत माहिती दिली.

सुभाष पावडे यांनी ग्रामगीता जीवन विकास परिक्षाबाबत,पांडुरंग शेंडे व मोतीराम नागोसे यांनी राष्ट्रसंत विचार प्रचारकार्य बाबत समयोचित विचार व्यक्त केले. उद्घाटक अभय कासनगोट्टूवार यांनी सुरगावच्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले तर बंडोपंत बोढेकर यांनीही अनेक उदाहरणे देत राष्ट्रसंतांनी दिलेली श्री गुरुदेव सेवा मंडळाची विचारधारा समजावून सांगितली . याप्रसंगी या भागात उत्स्फूर्तपणे कार्य करणारे ज्येष्ठ प्रचारक उद्धवराव झाडे,सुरेंद्र चोथले,पांडूरंग शेंडे,मनोहर पासपुते,मोतीराम नागोसे,छत्रपती गेडाम,अविनाश ठाकरे या प्रचारक मंडळींचा राष्ट्रसंत साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश हुलके यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनिल फलके यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष शंकर नेवारे,उपाध्यक्ष बंडू झाडे,सचिव मुन्नाजी चूधरी,प्रचारप्रमुख सफल कोटनाके,भजन प्रमुख चिरकुटा तलांडे,कोषाध्यक्ष येलमुले,संघटक ज्ञानेश्वर चांदेकर,विलास मेश्राम, अंकुश आत्राम,बंडू हजारे,शुभम आत्राम,साजन दुधकोर,कचरु तोडासे,मारोती नेवारे,देवाजी लिंगनपेल्लीवार आदींनी अथक परिश्रम घेतले, राष्ट्रवंदना गायनाने समारोप करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये