महात्मा गांधी महाविद्यालय येथे गणित दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना गणित विभागाचे प्रमुख डॉ. अजय कुमार शर्मा यांनी करून दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांनी भूषवले आणि प्रमुख वक्ते चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रमुख डॉ. रामनरेश सिसोदिया होते. डॉ. सिसोदिया यांनी गणित विषयातील रामानुजन यांच्या योगदानावर आपले विचार व्यक्त केले. बी.एससी.च्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनी सुश्री रिद्धी बोरा आणि एम.एससी.च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी सुश्री आरती शर्मा आणि सबरा अली यांनी राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि गणित विषयाच्या उपयुक्ततेवर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमात बी.एससी. भाग-१, २, ३ आणि एम.एससी. भाग-१, २ चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी एम.एससी. अंतिम वर्षाची विद्यार्थिनी साबरा अलीने आभार प्रदर्शन केले



