ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी समृद्ध शेती करावी 

मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकित सिंग यांचे शेतकऱ्यांना आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली येथे शेतकरी मेळावा तथा प्रगतशील शेतकरी सन्मान

    बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना शेती उत्पादनात घट होत आहे,शेतीचा खर्च सुद्धा झेपत नसल्याने अनेक शेतकरी शेती व्यवसायापासून दुर चालले आहेत, आपल्या शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध कृषी योजनां आहेत,शेततळे, कृषी यांत्रिकीकरण,पिक विमा योजना आदींचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी समृद्ध शेती करावी असे आवाहन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकित सिंग यांनी केले,ते सावली येथे आयोजित शेतकरी मेळावा व प्रगतशील शेतकरी सन्मान सोहळ्यात दुसऱ्या सत्रात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

        स्व.वामनराव गड्डमवार स्मृती प्रतिष्ठान द्वारे विश्वशांती विद्यालय सावली येथे शेतकरी मेळावा व प्रगतशील शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल बल्लमवार, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार प.स.साली,भा.शि.प्र.मंडाळाचे अध्यक्ष संदीप गड्डमवार,राजा बाळ संगिडवार, अनिल स्वामी,नरेश सुरमवार,रमा गड्डमवार,नंदा अल्लुरवार, सुनिल नरेड्डीवार, संजय गड्डमवार,नितीन गोहणे,विजय कोरेवार, नितीन दुवावार ,रवल गड्डमवार आदी उपस्थित होते.

       माती परीक्षणाच्या आधारे खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय व जैविक शेतीचा अवलंब, तसेच ठिबक व तुषार सिंचन पद्धतींचा उपयोग करण्यावर भर दिला. पीक फेरपालट, आंतरपीक व मिश्रपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहून उत्पन्नात वाढ होते, असेही पुलकित सिंग मार्गदर्शनात सांगितले.

   विविध कृषी योजनेत प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेततळे योजना, कृषी यांत्रिकीकरण आणि सुधारित बियाण्यांची माहिती दिली. व गटशेतीमुळे बाजारपेठेतील अडचणी दूर होतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

      डिजिटल शेतीच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज, बाजारभाव व तांत्रिक माहिती मोबाईलवर उपलब्ध होत असून याचा उपयोग करून शेती अधिक लाभदायक करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप गड्डमवार,संचालन संजय पडोळे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये