ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आडकुजी पाटील नन्नावरे यांची 101 वी जयंती सरस्वती विद्यालय मुधोली येथे संपन्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्हा माना समाज शिक्षण सहाय्यक मंडळ चंद्रपूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अडकुजी पाटील नन्नावरे यांची 101 वी जयंती माननीय श्री श्रावणजी नन्नावरे संस्थेचे उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सरस्वती विद्यालय मुधोली तालुका भद्रावती येथे संपन्न झाली.

 स्वर्गीय अडकुजी पाटील नन्नावरे हे 15 वर्षे सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद बांधकाम सभापती, दुर्गापुर थर्मल पावर स्टेशन विस्थापितांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक पदावर काम केले.

 मुधोली परिसरातील अनेक गोरगरिबांची शेती, घरे ,इराई धरणात गेली तेव्हा त्यांना न्याय मिळवून दिला. सर्व प्रकल्पग्रस्तांना नौकरी मिळवून दिली. आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून 1964 मध्ये स्वतःच्या घरी वस्तीगृहाची स्थापना केली व सर्व जाती-पातीतील मुलांना आपल्या वस्तीगृहामध्ये ठेवले. आज ते विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहे.

 तसेच आदिवासी ग्रामीण भागातील मुधोली सारख्या दुर्गम भागात विद्यार्थ्यांना शिक्षणाची अडचण जाणवू नये म्हणून त्यांनी 1987 ला सरस्वती विद्यालय मुधोली या शाळेची स्थापना केली.

 गरीबांच्या अंधार्‍या झोपडीत प्रकाश पोचवण्याचं कार्य, ज्ञानदानाचे महान कार्य या थोर महात्म्याने केले.

 कोणताही स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे समाजाकरीता संपूर्ण आयुष्य त्यांनी घालवले.

 1987 मध्ये लावलेले छोटस वृक्ष आज त्याचं वटवृक्षांमध्ये रूपांतर झालं.

 सरस्वती विद्यालय मुधोली ता.भद्रावती आणि सरस्वती विद्यालय, सालोरी ता. वरोरा या दोन शाळा त्यांनी स्थापन केल्या. आज गोरगरिबांची मुले या शाळांमध्ये शिक्षण घेत आहे.

प्रास्ताविकामधून मुख्याध्यापक श्री खोंड सर यांनी या ग्रामीण भागामध्ये एक जुनियर कॉलेज असावं व त्याकरीता संचालक मंडळ यांनी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले तसेच ज्या शिक्षण महर्षीने या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवली त्यांचा एक पुतळा शालेय परिसरात उभा करावा व तो पुढील 23 डिसेंबर 2026 पर्यंत नक्कीच उभा करू असे मत त्यांनी व्यक्त केले.

संस्थेचे सचिव मा. श्रीरामे सर यांनी ही संस्था उभी करण्याकरीता पाटील साहेबांनी यांनी जीवाचे रान केले सर्वांना सोबत घेऊन ही संस्था स्थापन केली याच वस्तीगृहाच्या माध्यमातून आम्ही सर्व घडलो हे प्रांजळपणे त्यांनी आपले मत व्यक्त केले.

संस्थेचे कोषाध्यक्ष प्राध्यापक राजनहिरे सर यांनी या संस्थेकरीता जे आम्हाला चांगले करता येईल ते नक्कीच करू असे मत त्यांनी व्यक्त केले.

सामाजिक कार्यकर्ते दयानंद जांभुळे यांनी पुढील सत्रामध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांना ये जा करण्याकरीता एका स्कूल वस्ती व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.

मा. गुणवंतराव दडमल आणि अनंतराव मगरे सर यांनी सुद्धा या संस्थेच्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र येऊन संस्था कशी मोठी होईल व शाळेची प्रगती कशी होईल असा सकारात्मक विचार मांडले.

शेवटी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रावणजी नन्नावरे साहेब यांनी या शाळेच्या प्रगती करीता संचालक मंडळ सदोदित मदत करेल असे मत व्यक्त केले.

 समाजाचे ज्येष्ठ नेते आणि स्वत: समाजाकरीता वाहून घेणारे स्वर्गीय आडकुजी पाटील नन्नावरे यांना विनम्र श्रद्धांजली वाहण्याकरिता त्यांचे आप्तसकीय मुलगा रवी पाटील, जावई दिगांबरजी वाघ आणि मुली मालाताई वाघ व उषाताई मगरे तसेच संस्थेचे सचिव श्रीरामे सर, संस्थेचे कोषाध्यक्ष राजनहीरे सर, गुणवंत दडमल संचालक, माधव जांभुळे संचालक, केशवराव जांभळे माजी सरपंच, दयाराम जांभुळे सामाजिक कार्यकर्ता, कलाम शेख शिक्षक पालक समिती उपाध्यक्ष, मारोती बावणे शिक्षक पालक समिती सहसचिव, डॉक्टर सुधाकरजी हनंवते, अनंतराव मगरे सर, सुकेशिनी घोडमारे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा, प्रमोदजी वाघ सामाजिक कार्यकर्ते, अजबराव नन्नावरे, शाळेचे मुख्याध्यापक विलास खोंड सर, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग 05 ते 10वी तील सर्व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

अनेक मान्यवरांनी जयंतीनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक मुख्याध्यापक यांनी केले कार्यक्रमाचे संचालन कु. रामटेके मॅडम यांनी केले तर आभार श्री नंदू जांभळे सर यांनी केले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये