निंबाळा (घोट) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५७ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबाळा (घोट) येथे श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यतिथी महोत्सव श्री गुरुदेव सेवा मंडळ, घोट–निंबाळा (ता. भद्रावती) यांच्या वतीने दि. २४ व २५ डिसेंबर रोजी भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीचे प्रचारक विशाल गावंडे यांच्या हस्ते घटस्थापना, सामुदायिक प्रार्थना व बोधपर प्रवचन होणार आहे. रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत ह.भ.प. योगिदास घागी महाराज यांचे प्रेरणादायी किर्तन संपन्न होणार आहे.
गुरुवार, २५ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० ते ५.३० वाजेपर्यंत सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामसफाई अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानंतर ह.भ.प. झनकजी चौधरी महाराज व नरेंद्रजी मेश्राम (भद्रावती) यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक ध्यान व बोधपर प्रवचन होणार आहे. सकाळी ९ ते ९.३० वाजता अल्पोपहार, तसेच रांगोळी स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा व मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी १ वाजता गोपाळकाला व किर्तन, तर ४ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचा सर्व भाविक व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विलास राऊत, प्रदीप नन्नावरे व कैलाश दूधकोहळे यांनी केले आहे.



