राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भद्रावतीत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालय भद्रावती व ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ डिसेंबर २०२५ (गुरुवार) रोजी वर्ग ८ वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा यशवंतराव शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, शिंदे पेट्रोल पंप समोर, भद्रावती येथे दुपारी १२.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी ग्राहकांचे अधिकार व जागरूक ग्राहक हे दोन विषय देण्यात आले असून विद्यार्थ्यांनी या विषयांवर आपली सर्जनशीलता चित्रकलेच्या माध्यमातून मांडायची आहे.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच भविष्यातील जबाबदार व सजग ग्राहक घडवणे हा आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



