ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिवसाचे आयोजन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :- येथील तहसील कार्यालयात मार्फत दि. २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम सकाळी ११.०० वाजता, पंचायत समिती सभागृह, प्रशासकीय भवन, पोंभुर्णा येथे आयोजित करण्यात आला आहे.
ग्राहकांचे हक्क, कर्तव्ये व संरक्षण याबाबत जनजागृती करणे हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश असून, या अनुषंगाने सदर कार्यक्रमात ग्राहक संरक्षण अधिनियम, ग्राहकांचे मूलभूत हक्क, फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता तसेच ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेबाबत उपस्थितांना माहिती देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार शेलवटकर यांनी दिली आहे.



