ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भस्तरीय चर्चासत्रात प्रा. डॉ. राजेश बोळे यांना उत्कृष्ट संशोधन लेख पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत बैद

विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र व वाणिज्य शिक्षक मंडळ, नागपूर विभाग यांच्या वतीने नागपूर येथे दिनांक 19 व 20 डिसेंबर 2025 रोजी आयोजित दोन दिवसीय रौप्य महोत्सवी चर्चासत्रात सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर (ता. कोरपना, जि. चंद्रपूर) येथील प्रा. डॉ. राजेश अशोक बोळे यांना त्यांच्या उत्कृष्ट संशोधन लेखासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रा. डॉ. बोळे यांनी पुरस्कार स्वीकारला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाचे नाव विदर्भ स्तरावर उज्वलपणे अधोरेखित झाले आहे.

या सन्मानाबद्दल सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूरचे अध्यक्ष डॉ. आनंदरावजी आडबाले, संस्था संचालक सदस्य श्री नोगराज मंगरूळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री महेंदकुमार ताकसांडे यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाने प्रा. डॉ. बोळे यांचे अभिनंदन केले आहे.

या यशाचे श्रेय प्रा. डॉ. बोळे यांनी आपले आई-वडील, संस्थाध्यक्ष, सहकारी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच समाजातील हितचिंतक व्यक्तींना दिले असून, विशेष प्रोत्साहन दिल्याबद्दल प्रा. दिनकर झाडे व प्रा. जयश्री बोबडे यांचे आभार मानले आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये