ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैद्य दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलीसांची धडक कार्यवाही

एकूण 56 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पो स्टे सावंगी मेघे येथील पोलीसांची कार्यवाही सावंगी पोलीस समतानगर झोपडपट्टी नागठाणा वर्धा येथे नाकाबंदी व पेट्रोलीग करीत असतांना मुखबीर कडुन खात्रीषिर खबर मिळाली की, विक्रमशिला नगर वर्धा येथे राहणारा सुशांत राजु खोब्रागडे वय 24 वर्ष रा विक्रमशीला नगर, वर्धा हा समतानगर झोपडपट्टी नागठाणा वर्धा येथील त्याचे खाली घरात त्याचे ताब्यातील चारचाकी गाडी सील्वर कलरचे मारुती सुझुकी अल्टो क्रमांक एम एच 31 CR 4377 नंबरचे या गाडीतुन विदेशी दारुचा साठा आपले घरात ठेवत आहे अशा खबरेवरून पंच व पो स्टॉफसह, समतानगर झोपडपट्टी नागठाणा सावंगी मेघे वर्धा येथे गेलो असता खबरे प्रमाणे एक ईसम आपले ताब्यातील सील्वर कलरचे मारुती सुझुकी अल्टो क्रमांक एम एच 31 CR 4377 नंबरचे या गाडीतुन विदेशी दारुचा माल आपले घरात नेताना दिसला पंचाना त्यास दुरुनच दाखवुन त्याचेवर पंच व पो स्टॉफचे मदतीने छापा टाकुन पकडले पंचासमक्ष त्याला त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सुशांत राजु खोब्रागडे वय 24 वर्ष रा विक्रमशीला नगर, वर्धा असे सांगीतले वरुन पंचासमक्ष त्याचे ताब्यातील सील्वर कलरचे मारुती सुझुकी अल्टो या गाडीची झडती घेतली असता.,

गाडीत 1) विदेशी दारुने भरलेल्या दारुच्या 2 खरड्याच्या खोक्यामध्ये ऑफिसर चॉईस कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 96 शिश्या प्रती शिशी 300 रू. प्रमाणे 28800/-रू. चा माल 2) 2 खरड्याच्या खोक्यामध्ये रॉयल स्टैंग कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 96 शिश्या प्रती शिशी 400 रू. प्रमाणे 38400/- रू. चा माल व पंचासमक्ष घराची झडती घेतली असता घरात 4) विदेशी दारुने भरलेल्या 5 खरड्याच्या खोक्यामध्ये रॉयल स्टैंग कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 240 शिश्या प्रती शिशी 400 रू. प्रमाणे 96000/- रू. चा माल 5) जुनी वापरती सील्वर कलरचे मारुती सुझुकी अल्टो क्रमांक एम एच 31 CR 4377 कींमत 400000/- रुपये असा एकुन जु.की. 563200/-रु चा माल अवैधरित्या विनापास परवाना वाहतुक करुन आपले घरात ठेवताना मिळुन आल्याने पंचनामा कार्यवाही करून नमुद आरोपी विरूध्द लेखी फिर्याद वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोह्वा अभय खोब्रागडे ब.नं 274, पोहवा आकाश चुगंडे व न 195 पोशी शाम सलामे ब.नं 1654, पोशी गौरव नरताम ब न 681 पोशी अमोल पवार व न 668 सर्व नेमुणकीस पोलीस स्टेषन सावंगी मेघे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये