मृद व जलसंधारण विभागाकडून त्रस्त झालेल्या महिला शेतकऱ्यांचे उपोषण सुरू
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
खडका शिवारात असलेल्या अल्पभूधारक महिला शेतकऱ्याच्या शेतात विना परवानगीने केलेल्या सिमेंट नाला बांधा मुळे होत असलेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या करिता वारंवार केलेल्या पत्रव्यवहाराला कंटाळून शेवटी त्या महिला शेतकऱ्याने उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रात मृदजलसंधारण विभागाने केलेल्या सिनाबा च्या कामा बाबत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधान भवनात विचारलेल्या प्रश्नांना सरकारने लावलेल्या तपासातील निष्कर्ष निघालेल्या अधिकारी यांना दोषी ठरवले त्याच धर्तीवर असलेला हा सिमेंट नाला बांध आहे. श्रीमती विमल विनायक वायाळ या महिला शेतकऱ्याच्या शेतात शेतकऱ्याच्या संमती शिवाय केलेला बांध हा त्या शेतकऱ्याच्या जीवावर बेतला असून या बांधा मुळे शेतीचे नुकसान होत असल्याने सदर विभागास नुकसानभरपाई मागितली असता टाळाटाळ केली जात आहेत.
ज्या ज्या वेळेस मृदजलसंधारण कार्यालय गाठले तेंव्हा अधिकारी, संबंधित इंजिनिअर हजर नसतात,महिला शेतकरी पुत्र संदीप वायाळ यांनी या बाबत प्रसिद्धी माध्यमातून न्याय मागण्याचा प्रयत्न केला मात्र न्याय मिळाला नाही असा आरोप त्या शेतकरी पुत्रांनी केला आहे, विशेष म्हणजे शेतकरी पुत्र हा अपंग असून त्यास येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे जलसंधारण विभागाचे बुलढाणा अधिकारी मुंडे यांच्या वर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.



