शेतकऱ्यांची एमएसईबी कार्यालयावर धडक
कृषी पंपाची वीज पूर्वत बारा तास सुरु करा : कॉम्रेड विनोद झोडगे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :_ तालुक्यात मागील वर्षी कृषी पंपाची वीज बारा तास नियमितपणे सुरू होती परंतु अचानक पणे गेल्या दोन-तीन महिन्यापासून आठ तास वीज सुरू आहे हा शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे शासनाने 12 तास वीज द्यावी हे आदेश असताना एम एस ई बी कार्यालयाकडून शेतकऱ्यावर अन्याय होत आहे यावर्षी खरीप हंगामात, पूर परिस्थिती,ओला दुष्काळ झाला त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेला असताना आठ तास वीज केल्याने पुन्हा शेतकरी मरणाच्या दारात जाईल याची दक्षता घ्यावी नुकताच आत्ता उन्हाळी हंगामात भात पेरणी झालेली आहे तेव्हा ब्रह्मपुरी तालुक्यातील कृषी पंपाची वीज दिवसा पूर्ववत बारा तास सुरु करावी.
जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पादनात त्याचा परिवार सुखी होईल अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही तसेच हळदा येथील नखाते डीपीला जाण्यास बारमाही रस्ता नसल्याने त्यासाठी पावसाळ्यात ट्रांसफार्मर, डीपी मेन स्विच बॉक्स व वीजतारा व तांत्रिक बिघाड आल्यास 15 ते 20 दिवस लाईट बंद असते परिणामी शेती पिके पाण्याअभावी नष्ट होतात तेव्हा सदरील ट्रांसफार्मर डीपी मेन स्विच बॉक्स बारमाही रस्त्याजवळ म्हणजेच रवींद्र नकाते यांच्या शेता जवळ घेण्यात यावे तसेच बोडधा येथील डीपी मेंन स्विच बॉक्स पूर्णतः नादुरुस्त असल्याने पावसाळ्यात चालू बंद करण्यात अडचण होत असतो भविष्यात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा दुरुस्ती करण्याचे कामे आत्ताच करण्यात यावी अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा मा.अवघडे कार्यकारी अभियंता यांना निवेदनातून शेतकरी नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांनी मागणी केलेली आहे.
यावेळेस ईश्वर ठाकरे,राजेंद्र झोडगे,मनोज हुलके, भक्तदास ठाकरे,प्रतीक डांगे, दत्तू नागोसे,अमोल मानापुरे यासह तालुक्यातील आदि शेतकरी उपस्थित होते.



