ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. बंटी बांगडीया यांच्या आश्वासननंतर तात्पुरत्या स्वरूपात महिलांचे उपोषण मागे…

पाणी आणि सरबत पाजून उपोषणाची सांगता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी तालुक्यातील खेड मक्ता येथील सरपंच दीक्षा भजनकर यांच्या नेतृत्वात महिला शेतकऱ्यांनी सायघाटा येथील गोसीखुर्द प्रकल्प कार्यालयासमोर दिनांक १५ डिसेंबर पासूनआमोरण उपोषण सुरू केले होते. तब्बल! सहा दिवसानंतर आमदार बंटी भांगडिया यांनी दिलेल्या तात्पुरत्या आश्वासनानंतर महिलांनी आमरण उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली.

आमदार बंटी भांगडिया यांनी तुमच्या पाणी समस्यांचे निवारण केले जाईल असे सांगितले. त्यानंतर उपोषण करत्या महिलां शेतकऱ्यांना सरबत आणि पाणी पाजून उपोषण मागे घेण्याचे आश्वासित केले. वरील संदर्भात टप्प्याटप्प्याने४५ किलोमीटर पर्यंत पाणी सोडण्यात येणार असून लागेल तेवढा पाणी धान्य पिक निगेपर्यंत मिळेल पण तो पाणी टप्प्याटप्प्या सोडला जाईल. असे आमदार बंटी भांगडिया यांनी सांगितले. यासंदर्भात शेतकऱ्यांची संदर्भीय बैठक नागपूर येथील विभागीय कार्यालयात सायंकाळी पार पडणार असून त्या ठिकाणी पूर्णत्व निर्णय घेतला जाईल अशी माहिती काँ. विनोद झोडगे यांनी दिली आहे.

याप्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँ. विनोद झोडगे, ब्रह्मपुरी नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास विखार, आवेश पठाण, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष कृष्णलाल सहारे, नागभीड तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष रडके, शिवसेना नेते चंद्रपूर ऊपजिल्हा प्रमुख संजय पारटवार, योगेश्वर ठाकरे, आणि ब्रह्मपुरी नागभीड तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये