केंद्रीय गस्त दरम्यान चारचाकी वाहनावर पोलीसांचा छापा
पाठलाग करून पकडले वाहण ; पोलीस जिपचे चालकाचा संतर्कपणा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
अवैध विदेशी दारूसाठा वाहनासह 10,20,000/- रू चा मुद्देमाल जप्त
पोलीस निरीक्षक संतोष ताले, हे पोलीस स्टॉफसह केंद्रीय पेट्रोलींग करीत असता सिध्दार्थ नगर, येथे रोडने एक चारचाकी वाहन जाताना दिसले व पोलीसाची गाडी पाहुन वाहन भरधाव वेगाने जात असल्याने सदर वाहनावर संशय आल्याने पोलीस चालक आकाश कुभरे यांचे संतर्कपणामुळे सदर एक पांढऱ्या रंगाची मारोती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट व्हिडीआय क. एम.एच.46/डब्लु/1876 चारचाकी वाहन पाण्याची टाकी जवळ सिध्दार्थ नगर, चितोडा रोडवर थांबवुन त्यास ताब्यात घेवुन, सदर वाहन चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता. त्याने त्याचे नाव मिथुन गोपालराव येळकर, वय 38 वर्ष रा. गणेश नगर, बोरगाव मेघे, वर्धा. असे सांगितले असता. त्याचे ताब्यातील एक पांढऱ्या रंगाची मारोती सुझुकी कंपनीची स्वीपट व्हिडीआय क. एम.एच.46/डब्लु/1876 चारचाकी वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता. गाडीची मागचे सिटवर व डिक्कीमध्ये खाकी रंगाचे खर्डाचे खोक्यात वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या
1) खाकी रंगाचे 14 नग खर्डाचे खोके प्रत्येकी खोक्यामध्ये 48 नग प्रमाणे एकुण 672 नग 180 एम. एल. च्या ऑफिसर चॉइस सुपरीम व्हिस्की कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या प्लॉस्टीक सिलबंद शिश्या ज्याचा बेंच क. 116 दि. 17.10.2025 असा असुन प्रती शिशी 300/- रू. प्रमाणे 2,01,600/- रू.
2) खाकी रंगाचे 07 नग खर्डाचे खोके प्रत्येकी खोक्यामध्ये 48 नग प्रमाणे एकुण 336 नग 180 एम. एल. च्या रॉयल स्टेंग कपंनीच्या विदेशी दारूने भरलेल्या काचेच्या सिलबंद शिश्या ज्याचा बेंच क. 115 दि. 11.11.2025 असा असुन प्रती शिशी 450/- रू. प्रमाणे 1,51,200/-
3) खाकी रंगाचे 01 नग खर्डाचे खोक्यामध्ये 48 नग 180 एम.एल. च्या ऑफिसर चॉइस ब्लु कपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या काचेच्या सिलबंद शिश्या ज्याचा बैंच क. 18 दि. 16.12.2025 असा असुन प्रती शिशी 400/- रू. प्रमाणे 19,200/- रू.
4) खाकी रंगाचे खर्डाचे 03 नग खर्डाचे खोके प्रत्येकी खोक्यामध्ये 12 नग प्रमाणे एकुण 36 नग 750 एम.एल. च्या ऑफिसर चॉइस सुपरीम व्हिस्की विदेशी दारूने भरलेल्या काचेचे सिलबंद बम्पर ज्याचा बॅच क. 94 दि. 23.09.2025 असा असुन प्रती बम्पर 1,000/- रू. प्रमाणे 36,000/- रू.
5) खाकी रंगाचे 01 नग खर्डाचे खोक्यामध्ये 12 नग 750 एम.एल. च्या ऑफिसर चॉइस ब्लु कपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या काचेच्या सिलबंद बम्पर ज्याचा बॅच क. 12 दि. 07.10.2025 असा असुन प्रती बम्पर 1,000/- रू. प्रमाणे 12,000/- रू. असा व
7) एक स्वीफ्ट व्हिडीआय क. एम.एच.46/डब्लु /1876 चारचाकी वाहन कि. 6,00,000/- रू असा एकुण जु.कि. 10,20,000/- रुपयांचा माल अवैध रित्या मिळुन आला.
आरोपी विरुध्द पोलीस ठाणे वर्धा शहर येथे अपराध कमांक 1857/2025 65(अ) (ई).77 (अ).83 म.दा.का. सह कलम 3(1), 181,130,177. मो.वा.का अन्वेय गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक सा. वर्धा, मा. अपर पोलीस अधीक्षक सा. वर्धा व मा. उपविभागीय पोलीस अधीकारी सां. वर्धा यांचे मार्गदर्शनात श्री. संतोष ताले, पोलीस निरीक्षक, ठाणेदार पो.स्टे. वर्धा शहर, पोलीस अंमलदार सुहास चांदोरे, पंकज भरणे, लोमेश गाडवे, सचिन भालशंकर, नवनित वानखेडे, मनोज काकतपुरे, आकाश कुंभरे यांनी केलेली आहे.



