सिंदखेडराजा नगरपरिषद : वर शरद पवार गटाचा झेंडा फडकला
सौरभ तायडे ठरले राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा नगरपरिषदेचा निकाल जाहीर झाला असून नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी बाजी मारली आहे. शरद पवार गटाचे उमेदवार सौरभ विजय तायडे यांनी ४,२८६ मते मिळवत १६९ मतांच्या निर्णायक फरकाने विजय संपादन केला.
त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे श्याम किसनराव मेहेत्रे यांना ४,११८ मते, तर शिवसेना (शिंदे गट) चे अतिश बाळाजी तायडे यांना ३,४६३ मते मिळाली. या विजयामुळे सिंदखेडराजा नगरपरिषदेवर शरद पवार गटाचा नगराध्यक्ष पदावरील दावा अधिक भक्कम झाला आहे.
नगरपरिषदेत तिहेरी सत्ता समीकरण, राजकारण रंगणार आहे.नगरसेवकांच्या निकालानुसार सिंदखेडराजा नगरपरिषदेत सत्तासमीकरणे अत्यंत चुरशीची झाली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – ७ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट + भाजपा) – ७ जागा
शिवसेना (शिंदे गट) – ६ जागा
अशा तिहेरी समीकरणात नगराध्यक्ष पद शरद पवार गटाकडे गेल्यामुळे आगामी सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
नगरपरिषदेच्या दहा प्रभागांतून विविध पक्षांचे प्रतिनिधी निवडून आले असून अनेक नव्या चेहऱ्यांना जनतेने संधी दिली आहे. काही प्रभागांत राष्ट्रवादी शरद पवार गटाने वर्चस्व राखले, तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानेही प्रभावी कामगिरी केली.
विकासाच्या अपेक्षा, नागरिकांचे लक्ष नव्या नेतृत्वाकडे जवाबदारी.नगराध्यक्ष पदावर मिळालेल्या विजयामुळे सिंदखेडराजा शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण व रोजगाराभिमुख उपक्रमांवर नव्या नगरपरिषदेचा भर राहील, अशी अपेक्षा आहे.
नवे नेतृत्व सत्तेत आल्यानंतर शहराच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना गती येणार असून सिंदखेडराजा नगरपरिषद राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.



