ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हा विजय जनतेच्या अपेक्षांचा आणि परिवर्तनाच्या इच्छेचा कौल _ खा. धानोरकर

चांदा ब्लास्ट

माझा लोकसभा क्षेत्रातील विशेषता चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षावर जनतेने विश्वास दाखविला असून विकास, पारदर्शकता आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने वाटचाल करण्याची मोठी जबाबदारी सोपविली आहे. हा निकाल म्हणजे सरकारविरोधी जनाधार आहे.

काँग्रेसच्या माध्यमातून विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे ध्येय आम्ही ठामपणे बांधले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली केवळ भ्रष्टाचार केला. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून स्वार्थी राजकारण केले. त्यामुळेच मतदारांनी लोकशाही मार्गाने त्यांना योग्य जागा दाखवली आहे.

हा विजय जनतेच्या अपेक्षांचा आणि परिवर्तनाच्या इच्छेचा कौल आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण, समावेशक आणि शाश्वत विकास साधण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हीच ग्वाही देत पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार मानते.

                   खासदार प्रतिभा धानोरकर

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये