फुटिनंतरही भद्रावतीत शिवसेनेचा गड अभेद्य
नगराध्यक्षपदी सेनेचे प्रफुल चटकी विजयी ; २९ पैकी सेनेचे १२ ऊमेदवार विजयी,भाजप बैकफुटवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शिवसेनेच्या फुटीनंतरही भद्रावती नगरपरीषदेवर शिवसेना शिंदे गटाने आपले वर्चस्व कायम राखीत आपला सत्तेचा गड शाबुत ठेवण्यात यश मिळविले आहे.शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे ऊमेदवार प्रफुल चटकी हे ८२९ मताधीक्य घेऊन विजयी झाले आहेत,कांग्रेसचे सुनील नामोजवार दुसऱ्या तर भाजपचे अनील धानोरकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
भाजप या निवडणुकीत पुरता अपयशी ठरला आहे.नगरपरीषदेच्या २९ जागांपैकी १२ जागी शिवसेना शिंदे गटाचे ,६ जागी कांग्रेसचे, वंचीतचे ४ जागी,भाजपचे २ जागी,ऊबाठा २ जागी,बिएसपी १ जागी,राष्ट्रवादी शरद पवार गट १ जागी तर १ जागी अपक्ष ऊमेदवाराने बाजी मारली आहे. हा निकाल बघता भद्रावती शहरात शिवसेनेचेच वर्चस्व अबाधीत असल्याचे दिसुन येत आहे.आजपर्यंत भद्रावती नगरपरीषदेवर शिवसेनेचे अबाधीत वर्चस्व राहिले आहे.
मध्यंतरी भद्रावती पालीकेवर प्रशासकाची सत्ता होती.दिर्घ कालावधिनंतर भद्रावती पालीकेची निवडणुक झाल्याने या निवडणुकीबाबत शहरातील मतदारांमधे कमालीची ऊत्सुकता होती.मध्यंतरी शिवसेनेत फुट पडल्यामुळे येथील शिवसेनेची ताकद संपुष्टात येईल असे बऱ्याच जाणकारांना वाटत होते.याचा फायदा भाजपला होईल असे जाणकारांना प्रथमदर्शनी वाटत होते.शिवसेनेच्या फुटीचा पाहिजे तसा फायदा भाजपला घेता आला नाही.या निवडणुकीत शहरातील मतदार शिवसेना शिंदे गटाच्या मागे खंबीरपणे ऊभे राहिले याचे फलीत म्हणजे पुन्हा एकदा शिवसेनेला पालीकेवर आपली सत्ता अबाधीत ठेवता आली.
सत्ता स्थापनेसाठी शिवसेना शिंदे गटाला १५ मैजीक फिगरची आवश्यकता आहे.ती त्यांना सहजपणे प्राप्त करता येईल.शिवसेनेच्या यशाच्या वाट्यात जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या कुशल नेतृत्वाचा वाटा आहे.



