ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आदरपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यवसाय विभागाचे प्रमुख व्ही. जी. मुप्पीडवार तसेच सहा. शिक्षिका भुवनेश्वरी गोपमवार उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे यांनी आपल्या मनोगतातून संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता, शिक्षण, समाजसेवा व अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या कार्यावर प्रकाश टाकला. सहा. शिक्षिका भुवनेश्वरी गोपमवार यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना गाडगे महाराज यांच्या विचारांचा अवलंब करून समाजहितासाठी कार्य करावे तसेच आपल्या सभोवतालचे परिसर स्वच्छ ठेवावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रा. जहीर एस. सैय्यद यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. नितीन टेकाडे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी प्रा. ए डी सातारकर, प्रा. एस पी कोल्हे, लिलाधर मत्ते आणि सीताराम पिंपळशेंडे यांनी परिश्रम घेतले.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला व संत गाडगे महाराज यांच्या कार्याची प्रेरणा देणारा ठरला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये