आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ. विनायक तुमराम

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथे होत असलेल्या पहिले गडचिरोली जिल्हा आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विचारवंत, आदिवासी साहित्याचे प्रवर्तक प्रा.डॉ. विनायक तुमराम यांची निवड करण्यात आली आहे.
दिनांक २३ व २४ डिसेंबरला आष्टी येथे होत असलेल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून ज्येष्ठ समीक्षक डॉ.प्रमोद मुनघाटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. आ. डॉ.मिलिंद नरोटे, माजी मंत्री तथा आ. धर्मरावबाबा आत्राम, आ. रामदास मसराम, माजी मंत्री राजे अंबरीशराव महाराज आत्राम,माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्राचार्य बनपूरकर, प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, साहित्यिक सुनील कुमरे, ज्येष्ठ साहित्यिक कुसुम अलाम यांच्यासह अनेक साहित्यिकांची मांदियाळी संमेलनात मार्गदर्शन करणार आहे. सदर
संमेलनात आदिवासी साहित्याची वाटचाल, साहित्य निर्मिती आणि प्रकाशन व्यवहार, आदिवासी साहित्य: समाज आणि संस्कृती, गडचिरोली जिल्ह्याचे आदिवासी साहित्य , आदिवासी जीवन वास्तव आणि नाटक, या विषयावरील परिसंवाद,
वाचायचे का ?कसे? कशासाठी ?
या या विषयावरील चर्चासत्र, कवी संमेलन आणि युवकाकरिता कवी संमेलन अशा विविध वैचारिक व बौद्धिक कार्यक्रमाबरोबरच आदिवासी कलाविष्कारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे हे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील साहित्यप्रेमींनी सदर साहित्य संमेलनात उपस्थित राहण्याचे आवहान स्वागताध्यक्ष वनवैभव शिक्षण मंडळाचे सचिव मा. अब्दुल जमीर उर्फ बबलूभैय्या हकीम,निमंत्रक प्राचार्य डॉ. संजय फुलझेले संयोजक प्रा.राजकुमार मुसणे व कवी संमेलन समन्वयक महेश कोलावार यांनी केले आहे.



