ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आखीव पत्रिकेचे भिजते घोंगडे मार्गी लावा

नगर परिषद भद्रावती क्षेत्रातील मालमत्ता धारकांची कुचंबणा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    ग्रामपंचायतीचे विलीनीकरण होऊन १९९७ मध्ये नगर परिषद भद्रावती ची निर्मिती झाली. विंजासन, सुमठाना, गवराळा, फुकट नगर आदी परिसरातील मालमत्ता धारकांना अजूनही मोजमाप न झाल्याने आखीव पत्रिका उपलब्ध होऊ शकली नाही. अनेकदा अनेकांनी प्रशासनाकडे निवेदने दिली. मात्र मालमत्ता कर गोळा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेने मालमत्ता धारकांच्या हक्काची अधिकृत आखीव पत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत ठोस कारवाईअजूनही केली नाही.

आज दिनांक ०५ फेब्रुवारी रोजी गणपती वॉर्ड गवराळा येथील तेजकरन बदखल, गणेश बदखल , शामराव चेंदे यांच्या नेतृत्वात भद्रावती चे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांना निवेदन सादर करण्यात येऊन अधिकृत आखीव पत्रिका उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल चटकी यांनी तसा प्रस्ताव तयार करून लवकरच मोजणी प्रक्रिया सुरू करून हि समस्या निकाली काढण्याची कार्यवाही करू असे संबंधिताना सांगितले.

निवेदन देते वेळी मधुकर सावन कर, देवराव खापणे, शंकर चिवंडे, धनराज शेरकी, पांडुरंग चिंचोलकर, अनिल झाडे, महादेव बुच्चे, सुभाष निंबाळकर, रमेश खापने, प्रणय घोरुडे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये