ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचं वास्तव मांडणारी ‘किस्सा टिकिट का’ शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या पसंतीस

चांदा ब्लास्ट

सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी ‘किस्सा टिकिट का’ ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. दिग्दर्शक देवा बुरडकर यांनी वास्तवदर्शी मांडणी करत समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना या चित्रपटातून प्रभावीपणे उभं केलं आहे.

आजच्या घडीला निवडणूक, तिकीट वाटप, राजकारणातील अंतर्गत संघर्ष आणि सामान्य माणसाची होणारी घालमेल या विषयांवर आधारित ही शॉर्ट फिल्म प्रचंड चर्चेत आहे. कमी वेळेत मुद्देसूद कथा, प्रभावी संवाद आणि वास्तवाशी साधर्म्य असलेली मांडणी यामुळे प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडियावर आणि युट्यूबवर ‘किस्सा टिकिट का’ ला मोठ्या प्रमाणावर शेअर, कमेंट्स आणि लाईक्स मिळत असून अनेक प्रेक्षकांनी “आजच्या परिस्थितीवर बोट ठेवणारा चित्रपट” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दिग्दर्शक देवा बुरडकर म्हणाले की, “आज जे समाजात आणि राजकारणात घडतंय, ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हीच आमची खरी कमाई आहे.”

स्थानिक कलाकारांचा सहभाग, वास्तवदर्शी लोकेशन्स आणि दमदार अभिनयामुळे ही शॉर्ट फिल्म विशेष ठरत आहे. ‘किस्सा टिकिट का’ ही शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर उत्सुकता दाखवली असून पुढील काळातही हा चित्रपट चर्चेत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये