ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ ॲप डाऊनलोड करावा _ तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

शेतीमधील समस्यांवर आता मिळणार घरबसल्या समाधान; कृषी विभागाचा डिजिटल उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- अंबुजा फाउंडेशन कडून शेतकरी मेळावा तालुक्यातील नंदप्पा येथे आयोजित करण्यात आला होता. जिवती सारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी कृषी विभागाने ‘महाविस्तार एआय’ (Mahavistar AI) हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
या ऑप मध्ये पिक वाढीच्या टप्यानुसार सल्ला, मृद आरोग्य पत्रिका, खत मात्रा गणक, माहितीपूर्ण व्हिडीओ, शेती शाळा, हावमान अनुकूल तंत्रज्ञान, कीड व रोग ओळख व त्यावर उपाय, सर्व पिकांचे बाजारभाव, विविध योजणांसाठी अर्ज करण्याची सुविधा तसेच चॅटबॅटद्वारे थेट प्रश्न विचारून तात्काळ उत्तरे मिळण्याची सोय उपलब्ध असल्याची माहिती कृषि अधिकारी यांनी दिले आहे.
जिवती तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार एआय डाउनलोड करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी हे ॲप का डाऊनलोड करावे?
‘महाविस्तार एआय’ हे केवळ एक ॲप नसून तो शेतकऱ्यांचा हक्काचा डिजिटल सल्लागार आहे. याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

आपल्या भाषेत संवाद :- शेतकरी मराठी भाषेतून बोलून किंवा टाईप करून प्रश्न विचारू शकतात.

शासकीय योजनांची माहिती :- महाडीबीटी, पीक विमा आणि इतर अनुदानाच्या योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध

कीड व रोग नियंत्रण :- पिकावर रोग पडल्यास त्याचे फोटो काढून किंवा माहिती देऊन तात्काळ उपाययोजना मिळवता येतात.

हवामान आधारित सल्ला :- हवामानातील बदलानुसार पिकांची काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन मिळते.
यावेळी तहसीलदार रुपाली मोगरकर, गट विकास अधिकारी दोडके, सुभाष बोबडे, सरपंच कर्नूबाई उदे, उपसरपंच गणेश कदम व समन्वयक अनेक शेतकरी उपस्थिती होते.

“जिवती तालुक्यातील कापूस, सोयाबीन आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ वरदान ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा खर्च कमी करावा आणि उत्पन्न वाढवावे, यासाठी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने आजच हे ॲप डाऊनलोड करावे.”
– माधुरी गावडे, तालुका कृषी अधिकारी जिवती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये