बनावटी पिवळ्या धातुचे दागीने भासवुन फिर्यादीची फसवणूक
एकुण ८ लाख ४४ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे फिर्यादी नामे श्री. संजय आंवटकर, रा. मांडगाव ता. समुद्रपुर, जि. वर्धा यांनी नकार दिली की, दिनांक २०/०१/२०२६ रोजी सकाळी ११/०० वा. दरम्याण ते आपले पत्नीसह त्यांचे कपडयाचे दुकानात हजर असतांना एक महीला व दोन अनोळखी पुरुष दुकानात आले, व त्यांचेशी बोलत बोलत त्यांचेकडे सोन आहे ते तुमही विकत घेता का, असे महणून त्याचे जवळील पिशवीतून पिवळया धातुचे मणी असलेल्या माळ दाखवुन त्यापैकी त्या माळेतील दोन मणी कावुन फिर्यादी यांना दिल्या व तुम्ही चेक करुन घ्या असे माटले. तेव्हा फिर्यादीयांनी त्यांना विचारले की, तुमच्या कडे किती सोने आहे. तेव्हा त्यांनी दुकानातील वजन काट्यावर त्यांचे जवळील पिवळ्या चातुचे मण्याचे माळाचे वजन करुन दाखवीले त्याचे वजन २ किलोग्रीम भरले व ते तिथेही फिर्यादीया मोबाईल क्रमांक चेवुन निधुन गेले. त्यानंतर फिर्यादी हे गावातील सोनाराकडे गेले व मणी चेक केले असता ते सोन्याचे असल्याचे सोनाराने फिर्यादीस सांगीतले. त्यानंतर सायंकाळी फिर्यादीचे मोबाईलवर फोनकरुन त्यांनी सोने येक केले काय? असे विचारले असता फिर्यादीने ते सोनेच मणी चेक केले व ते सोन्याचे असल्याचे सांगीतले. तेवहा त्यांनी त्या सोन्याची किंमत २५,००,०००/-रु असल्याचे फिर्यादीस सांगीतले, तेवहा फिर्यादीने त्यांना त्यांचे १०,००,०००/-रु. देतो असे माटले, त्यावर त्यांनी होकार देवुन फिर्यादीला दुसऱ्या दिवशी दिनांक २१/०१/२०२६ रोजी वर्षा बस स्थानक जवळ पैसे आनून दया व सोने घेवुन जा असे सांगीतले. त्यावरुन फिर्यादी व त्यांची पत्नी असे दुपारी ०२/३० वा. दरम्याण बजाज चौक, वर्षा येथील रामदेव बाबा मंदीराजवळ आले व त्यानी सोने विकी करणारे आरोपीतांना तेथे बोलावीले व तेथे फिर्यादीस आरोपीतांनी त्यांचे जवळील कापडी पिशवीतील ठेवून अमलेले पिवळया धातुचे वारीक मणी असलेल्या माळा दाखवील्या त्या काल दाखवील्याप्रमाणे खऱ्या सीन्यावे असल्याचे मांगीतल्या वरुन फिर्यादीने त्याचे जवळील नगदी १०,००,०००/-रु त्यांना दिले तेव्हा ते तिघेही लगेच तेथून निघून गेले. त्यांनतर फित्यांदी याने त्या माळेतील चार-पाच मणी काडून सराफा लाईन, वर्धा येथे ज्वेलर्म दुकाना समोर बसारे कारागीराम दाखवून चेक केले असता ते नकली असत्त्वाचे सांगीतले. फिर्यादी यांचे सदर तिन्ही ईसमांनी पिवळ्या धातुच्या माळी या खऱ्या सोन्याच्या असल्याचे भासवून नकली सोने देवुन फियाटीयांची नगदी १०,००,०००/-रु घेवून फसवनुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे दिलेल्या तक्रारी वरून अप. क्रमांक ६१/२०२६ कलम ३१८(४), ३००५) भा. न्या. स. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपासावर आहे सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानीक गुनी शाखा, वर्धा तर्फे करण्यात येत असतांना.,
फिर्यादी यांनी पटनेवेळी आरोपीतांचा मोबाईलव्दारे काढलेल्या फोटीवायत माहीती प्राप्ण केली असता मदर फोटो हा आरोपी नामे मंगल अमर मोलंकी, रा. कुबेरनगर, अहमदाबाद राज्य गुजरात याचा असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्यावावत माहीती वरीष्ठांना देवुन त्यांचे आदेशा प्रमाणे दोन पथक अहमदाबाद राज्य गुजरात येथे खाना होवुन तेथे पोहचुन सदर आरोपीबाबत माहीती येत असता सदर आरोपी हा मागील बार महीण्या पासून मानेवाडा, नागपुर (महाराष्ट्र) येने त्यांचे परीवारासह राहत असल्याबाबतची विश्वसनीय माहीती प्राप्त झाल्याने गुजरात येचुन दिनांक ०३/०२/२०२६ रोजी नागपुर येथे परत येवून बालाजी नगर मानेवाडा, नागपुर परीसरात आरोपीतांचा शोध घेत असता मिळालेल्या माहीती प्रमाणे ते राहत असलेल्या ठिकाणी जावून पाहणी केली असता सदर ठिकाणी माहीती प्रमाणे १) मंगल अमर सोलंकी, वय २८ वर्ष, रा. कुबेर नगर, अहमदाबाद राज्य मुजरात है.मु बालाजी नगर, मानेवाडा रोड, नागपूर, व २) श्रीमती राजकुमारी विष्णु पवार, वय ५४ वर्ष, रा. मुलतानपुरी, दिल्ली, ह.मु दत्तुजी हातागडे याने परी कीरायाने, प्लॉट क्रमांक १५, बालाजी नगर, मानेवाडा, नागपुर ही मिळून आली त्यांना सदर गुन्हयाचावत विचारले असता त्यांनी सदर गुन्हा हा त्यांचा तिसरा साथीदार नामे ३) बबलु राजेश राठोड, रा. ज्ञानेश्वर नगर, मानेवाडा नागपूर गाये यह कोल्याचे सांगीतल्याने त्याचे ताब्यातून व वरझडती मधुन १) भारतीय चलनाचे ५०, १०० व ५००/- रूपये मुल्याचे एकुण नगदी ७,२१,४००/-रु. २) दोन पिवळया धानुचे (नकली सोन्याच्या) गील मनी असलेल्या माळा अंदाजे वजन २ किलो ग्रॅम प्रती किलो १०,०००/- प्रमाणे २०,०००/-रू, ३) एक अॅन्ड्राईड व एक किर्पड चा मोचाईल किंमत २३,४९९/-रु. ४) गुन्हा करते वेळी वापरलेली एक होन्डा कम्पनीची डीओ मोपेड गाड़ी क्रमांक एम.एच. ४९ वि. एच. ६१९० कि. ८०,०००/- असा एकुण जुमला किमत ८,४४,८९९/- रू. चा मुदद्देमाल दोन्ही आरोपीतांचे नाव्यातून जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपीतांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) यांचे ताब्यात देण्यात आले आहे. मटर गुन्हयातील आरोपी मंगल अमा सोलंकी, वय २८ वर्ष, रा. कुझे नगर, अहमदाबाद राज्य गुजरात ह.मु वात्पजी नगर, मानेवाडा रोड, नागपुर, हा सदरचे गुन्हे करण्याचे सवईचा असून त्यांचे कडून अशा प्रकारचे इंतरही ठिकाणी केलेले गुन्ह उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाषमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, स.पो. नी. आशिषसिंग ठाकुर, पो.उप. नि. विजयसिंग गोमत्यडू, पोलीस अंमलदार चंद्रकांत सुरंगे, सचिन इंगोले, भूषन निघोट, प्रमोद पिसे, मोहवा निलीमा उमक, अमोल नगराळे, मंगेश यायो, राहुल अधवाल, रितेश गेटमे, दिनेश बोचकर, गोविंद मुंडे, सर्व नेमणूक रखानिक गूनो शाखा, वर्धा यांनी केली.



