ताज्या घडामोडी
डॉ. मुंधडा यांच्या निधनाने अभ्यासू व ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले – हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ चंद्रपूर शहरातील ज्येष्ठ समाजसेवी, सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ. गोपाल मुंधडा यांचे दुःखद निधन हे चंद्रपूर जिल्ह्याच्या वैद्यकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राची हानी आहे. सामाजिक बांधिलकी स्विकारून त्यांनी विविध नागरी समस्या, पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी सतत संपर्क ठेऊन कार्य केले. त्यांच्या निधनाने एक अभ्यासु, मार्गदर्शक व ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करतो आणि या कठीण प्रसंगी त्यांच्या परिवाराप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.



