सायवन गावाजवळील राखेचा ढिगारा व वाहतुकीवर उपाययोजना करा
भाजपचे तहसील कार्यालयात निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील सायवन गावाजवळ सिटीपीएस मधून निघणाऱ्या राखेची साठवणूक करुन तिची वाहतुक करण्यात येत आहे.हि राख वातावरणात मिसळून त्याचा त्रास सायवन येथील गावकऱ्यांना होत आहे. ऊडणाऱ्या राखेमुळे गावखऱ्यांना आरोग्याचा त्रास होत असुन त्याच्यात श्वसनाच्या रोगांचे प्रमाण वाढत आहे.
याशिवाय या राखेच्या होत असलेल्या वाहतुकीमुळे रस्त्यावर राख पसरुन अनेक अपघात झालेले आहे.त्यामुळे गावकऱ्यांचा जिवीताला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे या राखेच्या ढिगाऱ्यांवर व वाहतुकीवर आवश्यक ती उपाययोजना करुन येथील गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील भाजपतर्फे भाजप महिला मोर्चा ग्रामीण च्या तालुकाध्यक्षा रक्षीता निरंजने यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात सादर करण्यात आलेल्या एका निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना भाजप महिला मोर्चा ग्रामीणच्या तालुकाध्यक्षा रक्षीता निरंजने,ज्योती शेडमाके,लालाजी साव,पत्रु गेडाम,बादल अलोणे,वंदना दुर्वे,प्रफुल शेडमाके,मंगेश जुमनाके,मनोहर तलांडे,प्रवीण मेश्राम, विजय गायकवाड, सुनील जुनघरे,आशीष नगराळे,सुजाता चिवंडे,रामवती ताई,अनील जुमनाके आदी उपस्थीत होते.



