ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गडचांदूर आश्रमशाळेचा विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आदिवासी विकास नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शनी दिनांक 13,14 व 15 डिसेंबर 2025 ला जिल्हा क्रीडा स्टेडियम चंद्रपूर येथे संपन्न झाल्या. यामध्ये विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत उच्च माध्यमिक गटामधून शरदचंद्र पवार उच्च माध्यमिक आश्रम शाळा, गडचांदूर ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून राज्य स्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत निवड झाली आहे. शाळेच्या वतीने मार्गदर्शक शिक्षक श्री. शहाबाज खान व सहभागी विद्यार्थिनी कु. पल्लवी इष्टाम व कु. वेदिका येरकाडे यांचा सत्कार करण्यात आला.



