महाराष्ट्र राज्याचे औद्योगिक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लोहारा गावातील वैद्यराज मनोहर मेश्राम यांची घेतली भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
चंद्रपूर :_ महाराष्ट्र राज्याचे औद्योगिक मंत्री मंगल प्रभात लोढा यानी दि. १३/१२/२०२५ ला साय. ०७:३० वा वैद्यराज मनोहरजी कवडूजी मेश्राम याच्या राहत्या घरी स्वतः जावुन भेट घेतली.
वैद्यराज मनोहरजी कवडूजी मेश्राम मु. लोहारा जि. चंद्रपुर महाराष्ट्र राज्य हे ३० वर्षा पासुन वन औषधी तयार करून अनेक रोगांवर उपचार करत आहेत.
यात प्रामुख्याने १) कर्करोग (Cancer), २)सिकलसेल्स , ३) लकवा, ४) मधुमेह (Diabetis), ५)Blockage Veins (दबलेली नसे) या वन औषधी मुळे अनेक रोगी ठीक होत आहेत. धकाधकीच्या जीवनात मानवाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. व आधुनिक जग विकसीत होत असताना, रासायनिक औषधाचा वापर व खर्च मोठ्या प्रमाणात होत आहे.
आहारातील फळभाज्या वरती रासायनिक कीटनाशकांचा वापर करण्यात येत आहे. त्यांचा मानवी जीवनावर गंभीर दुष्परिणाम होत आहे. WHO च्या माहिती नुसार सन २०३० पर्यन्त भारतात मोठ्या प्रमाणात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढणार आहे. परंतु वन औषधाचा वापर केल्या मुळे मानवी शरीरावर कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही.
श्री मनोहर मेश्राम यांचे महाराष्ट्र राज्याच्या अनेक जिल्ह्यात TRTI च्या योजने मार्फत स्टॉल असतात, याची माहिती औद्योगिक मंत्री महाराष्ट्र राज्य. मंगल प्रभात लोढा समजताच. त्यांनी दि १३/१२/२०२५ ला वैद्यराज मनोहरजी मेश्राम याच्या राहत्या घरी स्वतः परस्पर भेट घेतली. व त्यांच्या कुटुंबासोबत अर्धा तास विशेष चर्चा केली. यात त्यांचा मुलगा मुकुल मेश्राम, मुलगी इशीका, पल्लवी, सुनबाई रुपाली व त्याच्या पत्नी सौ. मंगलाताई मेश्राम उपस्थीत होते.
मंत्री महोदय यांचा गावामधे परिचय व्हावा म्हणून, मनोहर मेश्राम व गुरुदेव सेवा मंडळ लोहारा सदस्या मार्फत
भजन कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. मा. मंत्री महोदय यांनी भजन कीर्तनाचा आनंद घेतला. याच निमित्ताने गावकऱ्यांशी संवाद सुद्धा साधला.



