अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूर तर्फे ४३ व्या धात्विक खाण सुरक्षा सप्ताह २०२५ मध्ये खाण तपासणीचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूरच्या नोकारी लाईमस्टोन खाणी तर्फे खाण सुरक्षा महासंचालनालय (डीजीएमएस) पश्चिम विभाग, नागपूर प्रदेश १ आणि २ यांच्या नेतृत्वाखाली ४३ व्या धात्विक खाण सुरक्षा सप्ताह-२०२५ मध्ये खाण तपासणीचा शुभारंभ दिनांक १४ डिसेंबर रोजी नागपूर येथे करण्यात आला.
या समारंभात श्री प्रफुल्ल रंजन ठाकूर, (संचालक खाण सुरक्षा नागपूर प्रदेश-१), श्री दुर्गा शंकर सालवी (संचालक खाण सुरक्षा नागपूर प्रदेश-२), श्री एस आर महतो, उपसंचालक खाण सुरक्षा, नागपूर प्रदेश-२), श्री के श्रीनिवास (उपसंचालक खाण सुरक्षा, नागपूर प्रदेश-२), श्री सौदीप घोष, (उपसंचालक आणि एजंट खाण अल्ट्राटेक, आवारपूर), नागपूर प्रदेशातील खाण क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी उपस्थित होते आणि या भव्य यशस्वी कार्यक्रमाचा भाग बनले.
या वर्षी खाण सुरक्षा आठवड्यात एकूण ४१ खाणी सहभागी होत आहेत आणि खाण तपासणी एकूण १८ सदस्यांचे पाच संघ तयार आले आहेत. सुरक्षितेचा विचार, हाच आपला सुरक्षा कवच ही या वर्षीची थीम आहे. खाण सुरक्षा सप्ताह साजरा केल्याने खाणी आणि त्याच्या उपक्रमांबद्दल लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देण्यात मदत होते, त्यामुळे खाण कामगारांमध्ये सुरक्षितता आणि सजगता, आरोग्याबद्धल जागरूकता निर्माण होते.



