ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना परिसरात रेती तस्करी जोरात

महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा :_  परिसरात अविरत तस्करांची रेती विक्री जोमात सुरू आहे. अवैध रेती उत्खनन व वाहतूक होत असताना महसूल प्रशासन गाढ झोपेत कसा यामध्ये नेमके पाणी कुठे मुरत आहे. परिसरात तलाठी मंडळ अधिकारीमहसूल प्रशासनाचे दुर्लक्ष तसेच तहसीलदार यांच्या दुर्लक्ष व साठगाठ असल्याने रेती तस्करी जोरात सुरू आहे. काही तर रेती तस्करांनी जेसीपीच्या मदतीने रेती भरून साठवून जादा भावाने विक्री करत आहे. याबाबत तहसीलदार यांना सर्व माहिती असताना सुद्धा तक्रारी करून देखील कारवाई होत नाही.

मागील वर्षी अनेक तक्रारी झाल्या परंतु तहसीलदाराच्या कानावर माशी बसली नाही तसाच प्रकार गेल्या पंधरा दिवसापासून जोरात सुरू असून अनेक वाहनधारकांनी दबक्या आवाजात नाव जाहीर न करण्याच्या अटीवर तहसीलदार तलाठी व तस्कर मिळूनच हा प्रकार करत असल्याने या ठिकाणी अनुचित घटना व वातावरण गढूळ होण्यास प्रशासनाचे वचक नसल्याचा हा परिणाम असल्याचे जनतेमध्ये चर्चा मात्र जोरात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये