चनई बु.ता.कोरपना आदिवासी पारंपरिक ढेमसा मंडळ भगवान बिरसा कला संगम स्पर्धेत राज्यात दुसरे
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूरचे वतीने सत्कार संम्पन्न.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
विदर्भ स्तरीय शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रम शाळा संघ विदर्भातील 9प्रकल्पाचे वतीने विविध शालेय क्रीडा स्पर्धा, व विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन व उदघाट्न दिनांक 13/12/2025 रोजी शनिवारला आदिवासी विकास विभागाचे वतीने आयोजित करण्यात आले.
यामध्ये या कार्यक्रमाचे उदघाट्न आयुषी सिहं मॅडम उपायुक्त नागपूर आदिवासी विकास विभाग यांचे हस्ते पार पडले, यावेळी विकासजी राचलवार जिल्हा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग व आदिवासी समाजातील सामाजिक पदाधिकारी, व इतर 9 प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी, व विद्यार्थी चंद्रपूर शहर व ग्रामीण मधून उपस्थित होते. त्यावेळी भगवान बिरसा कला संगम 15 वी जयंती निमित्य राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय पारितोषिक रोख 2 लक्ष पटकविणाऱ्या चनई बु. ता. कोरपना येथिल पारंपरिक ढेमसा मंडळाला राज्यस्तरीय भगवान बिरसा कला संगम यामध्ये द्वितीय पारितोषिक पटकविल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा आदिवासी विभागाच्या वतीने एक लक्ष रुपये चेक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आदिवासी सेवक वाघूजी गेडाम,भाजपा जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरुणजी मडावी, प्रमोद कोडापे जिल्हा प्रभारी संयोजक भगवान बिरसा कला संगम चंद्रपूर,मनोज तुमराम ता.अध्यक्ष जमाती मोर्चा कोरपना, संदीप मडावी गट प्रमुख व आदी कलावंत संच उपस्थित होते.



