राणी राजकुंवर भगिनी समाज संस्थेचा 90 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
दि. 12 डिसेंबर 2025 ला राणी राजकुंवर भगिनी समाज या संस्थेचा 90 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्या अंतर्गत राणी राजकुंवर प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेलमिलाप संस्थेच्या अध्यक्षा सौंदर्या मुरुगेसन तसेच प्रमुख वक्त्ता म्हणून साहित्यिक लेखक आणि शाळेचे माजी विद्यार्थी आशिषजी देव उपस्थित होते. तसेच संस्थेच्या अध्यक्षा प्राजक्ताताई भालेकर, उपाध्यक्षा सौं माधवीताई भागवत, सचिव मुग्धा पाठक, सहसचिव अपर्णा येनारकर यांनी उपस्थित राहून प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमास शाळेचे माजी शिक्षक यांनी ही उपस्थिती दर्शिविली. शाळेचा माजी विद्यार्थी मनन वालकोंडावार यास शालेय बचत बँकेत सर्वाधिक रक्कम बचत केल्याबद्दल गौरव चिन्ह देवून कौतुक करण्यात आले.
शाळेची विद्यार्थिनी पिहू मुनघाटे हिला आदर्श विद्यार्थिनी म्हणून पाहुण्यांच्या हस्ते गौरव चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्नेहसंमेलनात विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा ही संकल्पना घेऊन स्नेहसमेलन साजरे झाले. कार्यक्रमात पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्नेहा मिसार आणि रागिणी नंदुरकर यांनी केले. तसेच आभार रसिका पोटे यांनी मानले.



