ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरपट्ट्यासाठी नागरिकांनी विहित नमुन्यात अर्ज भरावा, प्रशासनाने पट्टे वाटप प्रक्रिया गतिशील करावी – आ. जोरगेवार

जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागांची बैठक

चांदा ब्लास्ट

कायमस्वरूपी पट्टे वाटप करण्यासंदर्भात आपण अनेक बैठका घेतल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा याबाबत निर्देश दिले आहेत. असे असतानाही सदर प्रक्रिया अतिशय मंद गतीने सुरू आहे. त्यामुळे या प्रक्रियेला गती देण्यात यावी. घरपट्ट्यासाठी नागरिकांनीही विहित नमुन्यात अर्ज भरावा, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत.

नागरिकांना कायमस्वरूपी पट्ट्यांचे वाटप प्रक्रियेबाबत नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर निर्देश दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त नरेश अनकुरे, उपजिल्हाधिकारी विद्या गायकवाड, उपायुक्त चित्रावार, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते प्रकाश देवतळे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर आदींची उपस्थिती होती.

            चंद्रपूर आणि घुग्घूस येथील नागरिकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावेत, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. परिणामी सदर प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई आणि चंद्रपूर येथे बैठका घेतल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते.

दरम्यान, आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित सर्व विभागांची जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्रित बैठक बोलावून प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांना त्यांच्या हक्काचे पट्टे आपण वाटप करणार आहोत. यासाठी राज्य सरकारही सकारात्मक आहे. आता सर्व यंत्रणांनी समन्वय साधत ही प्रक्रिया गतिशील करणे गरजेचे असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. नागरिकांना सदर अर्ज नमुना उपलब्ध करून देण्यात यावा, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, २०११ पूर्वी नाव असलेली व्यक्ती आजघडीला हयात नसल्यास त्यांच्या वारसांची नावे चढविण्यात यावीत, असे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये