सावलीत हळदीकुंकू विविध कार्यक्रम व सत्कार समारंभ
स्पंदन सखी परिवार बसस्टॅण्ड ग्रुपचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
स्पंदन सखी परिवार बसस्टॅण्ड ग्रुप सावली च्या वतिने नुकताच जुन्या नगरपंचायतच्या पटांगणावर हळदीकुंकू, विविध कार्यक्रम व सत्कार सामारंभ आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात सावली येथील परीचित स्वच्छता दूत व पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे तालुका कार्याध्यक्ष प्रशांत तावाडे यांच पुष्पगूच व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला नेहमीच लोकोपयोगी कामे करणारा गरजावंताच्या मदतीस धावून जाणारा स्वच्छतेचा वसा घेऊन नेहमीच गोळीबार चौक जयभिम वाचनालय बुध्दविहार परिसरातील केरकचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट करणारा सोबतच लोकसहभागातून लोकोपयोगी कामे करणारा प्रशांत तावाडे चा स्पंदन सखी परिवार बसस्टॅण्ड ग्रुप सावली च्या वतीने आयोजित हळदीकुंकू वानाचा कार्यक्रम व सत्कार समारंभ कार्यक्रमात गौरविण्यात आले तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पंदन सखी परिवारातील सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले



