ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायकल यात्रेद्वारे संत नामदेव महाराज विश्व महासंमेलनाचा संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

नागपूर येथे होणाऱ्या संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे येथील सुशील बोबडे यांनी सायकल यात्रेद्वारे भारत भ्रमणाचा उपक्रम हाती घेतला आहे.

नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर दि. १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी हे महासंमेलन होणार असून, या कार्यक्रमास देशभरातून शिंपी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सुशील बोबडे यांनी दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी तिरुपती बालाजी येथून सायकल यात्रेला सुरुवात केली. या प्रवासादरम्यान त्यांनी शिक्षण, राष्ट्रीय एकात्मता, भारतीय संविधान तसेच संत नामदेव महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांवर विविध ठिकाणी जनजागृती व मार्गदर्शन केले.

दि. १४ डिसेंबर रोजी ते भद्रावती येथील नामदेव दांडेकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी स्थानिक समाजबांधवांनी त्यांचा सत्कार केला. तसेच आयोजित महासंमेलनाची सविस्तर माहिती समाजबांधवांना देण्यात आली.

याप्रसंगी नामदेव दांडेकर, शोभा दांडेकर, महेंद्र मनगटे, मंगेश ढपकस, राहुल ढाले, किरण देवगिरीकर, रामचंद्र दीडमुठे, दीपक दांडेकर, अनिल टिकले, कल्पना टिकले, बालाजी दांडेकर, सुनील कोहळे, माधुरी ढगे, भाग्यश्री दांडेकर आदी समाजबांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये