मेडा हेल्थ केअर सेंटर येथे हदयरोग तथा स्त्रीरोग वंध्यत्व आरोग्य तपासणी शिबिर
महावीर इंटरनॅशनल चंद्रपूरच्या वतीने आयोजन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ जनसेवा हीच ईश्वर सेवा याला लक्षात ठेवून डॉ. श्याम मेडा तसेच डॉ. प्राची मेडा, यांच्या संयुक्त सहयोगाने दि. २१ डिसेंबर २५ ला रविवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले आहे. या शिबिरामध्ये हृदययाशी संबंधित तपासणी व स्त्रीरोग व वंध्यत्व यांची तपासणी करून योजना अधीन त्यांच्या काही सुटमध्ये त्यांचे समाधान करण्यात येणार आहे.
यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी ह्या शिबिराचा उपयोग घेऊन तपासणी करावी. असे आवाहन महावीर इंटरनॅशनलच्या वतीने सर्व सभासदानी केले आहे.
यात इतरही सूट देण्यात येणार आहे. त्यात रक्त तपासणी (ECHO, TSH, KFT,HB) ह्यासारख्या तपासण्यावर भारी सूट देण्यात येणार आहे.
याकरिता चंद्रपूर तथा संपूर्ण जिल्हा वासियानी ह्या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन एम. आय. चंद्रपूर तथा मेडा हॉस्पिटलने केले आहे.



