सरपंच पत्नीचा विनयभंग : आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील एका गावातील सरपंच यांच्या २९ वर्षीय पत्नीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चंदनखेडा येथील भाऊराव उरकांडे (वय ४०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
फिर्यादी महिला शेतातील धानकापणी कामासाठी वारंवार आरोपीच्या वाहनाने प्रवास करत असल्याने त्यांच्यात ओळख निर्माण झाली होती. दिनांक ९ डिसेंबरच्या रात्री सुमारास ९ वाजता आरोपी हा महिलेच्या घरी गेला. त्या वेळी फिर्यादीचा पती गावातील कीर्तन कार्यक्रमासाठी गेलेला असल्याने घरात कोणीही उपस्थित नव्हते. हीच संधी साधून आरोपीने महिलेचा हात पकडून तिला जबरदस्तीने जवळ घेत विनयभंग केला, अशी तक्रार फिर्यादीने दिली आहे.
दरम्यान, घटनेदरम्यानच महिलेचा पती घरी परतला असता आरोपी घराबाहेरून पळ काढला. तत्काळ भद्रावती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर सुचनापत्रावर त्याची सुटका केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलिसांकडून सुरू आहे.


