परिवहन विभागाच्या नावावरच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स (अँड्रॉइड पॅकेज किट) व खोट्या ई-चलन लिंक पासून नागरिकांनी सतर्क राहावे

चांदा ब्लास्ट
अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवा संदर्भात बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाईल अॅप्स (अँड्रॉइड पॅकेज किट) तसेच SMS/WhatsApp द्वारे खोट्या लिंक पाठवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे वाहनचालक व वाहनमालक यांची व्यक्तिगत माहिती चोरी, बँकिंग तपशीलांची गळती आणि ओळखीचा गैरवापर होत आहे.
फक्त खालील अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करा :
* वाहन नोंदणी सेवा (VAHAN) – https://vahan.parivahan.gov.in
* ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) – https://sarathi.parivahan.gov.in
* परिवहन सेवा – https://www.parivahan.gov.in
* ई-चलन पोर्टल – https://echallan.parivahan.gov.in
वरील सर्व संकेतस्थळे नेहमी “.gov.in” नेच समाप्त होतात.“.com”, “.online”, “.site”, “.in” अशा इतर डोमेनवरील कोणतीही वेबसाइट उघडू नये.
असे असतात फसवणूक करणाऱ्यांचे संदेश :
* “आपल्या वाहनाचे चलन बाकी आहे, त्वरित पैसे भरा” असे धमकीवजा संदेश
* बनावट पेमेंट लिंक पाठवून त्वरित दंड भरण्याची जबरदस्ती
* “तुमचा DL सस्पेंड होणार आहे, लिंकवर क्लिक करून तपासा” असे संदेश. परिवहन विभाग किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय कधीही WhatsApp वर पेमेंट लिंक पाठवत नाही.
खालीलप्रमाणे अनधिकृत APK अॅप्स डाउनलोड करू नयेत :
* RTO Services.apk
* mParivahan Update.apk
* eChallan Pay.apk
तसे केल्यास तुमचा OTP, बँकिंग माहिती, वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते.
संशयास्पद लिंक/संदेश आल्यास त्वरित तक्रार करा :
* National Cyber Crime Portal – https://www.cybercrime.gov.in
* सायबर फसवणूक हेल्पलाइन – १९३०
* जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन. असे सह परिवहन आयुक्त शैलेश कामत मुंबई यांनी कळविले आहे.


