घरफोडी करणाऱ्या आरोपीकडुन गुन्ह्यातील सोन्याचे दागिने व नगदी एकुण ५२ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 05/12/2025 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी नामे सौ. निकीता रवि भांगे वय 33 वर्ष रा. डांगरी वार्ड हिगणघाट जि. वर्धा हे दिनांक 18/11/2025 रोजी दुपारी 12/00 ते 19/00 वा. दरम्यान बाहेरगावी गेले असता त्यांच्या बंद घरात प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने एक जोड कानातील सोन्याचे कानातील टॉप्स व नगदी 10,000/- रु अज्ञात इसमाने चोरी करून नेले. अश्या फिर्यादी यांचा तक्रारीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट अप क्रमांक 1771/2025. कलम 305 BNS नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
नमुद गुन्हा अज्ञात आरोपीतांने केला असल्याने तो उघड होण्याकरीता स्था.गु.शा वर्धा हे समांतर तपास करीत घटणास्थळी भेट देवुन सदर चोरी संबधाने मुखबीररकडुन माहीती मिळाली की सदर ची चोरी डांगरी वार्ड हिगणघाट येथे राहणारा नंदू बोडे यांनी केली असावी अशा गुप्त माहितीवरून माहीतीवरुन नंदू बोडे यास आठवडी बाजार हिंगणघाट येथून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचे चोरी संबंधाने विचारपूस केली असता आरोपी याने सदर चोरी केल्याचे कबुली दिल्यावरुन आरोपी नंदू राजू बोडे वय 23 वर्षे राहणार डांगरी वॉर्ड हिंगणघाट याच्या ताब्यातून एक जोड सोन्याचे कानातील टॉप्स व नगदी जु. की. 52,500/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन. सदर चा मुद्देमाल व आरोपी सह पुढील तपास कामी पो. स्टे. हिंगणघाट यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधिक्षक वर्धा, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शानात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी,पोउपनि प्रकाश लसुन्ते, पोहवा. शेखर डोंगरे, पो. शि. विकास मुंडे. पो.शि. सुगम चौधरी, पो.शि.शुभम राउत, दिनेश बोथकर चालक राहुल लुटे, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



