ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धानपीक नुकसानग्रस्त ३९ शेतकऱ्यांना आयपीएल कंपनीकडून ३० लाख ९७ हजार ८०० रुपयांची भरपाई

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मिळाली मदत

चांदा ब्लास्ट

मुल व पोंभूर्णा परिसरातील शेतशिवारात ‘सॉलिड’ औषधाच्या दुष्परिणामाची पुष्टी

आ.मुनगंटीवार यांचे मानले शेतकऱ्यांनी आभार

चंद्रपूर :-मुल आणि पोंभूर्णा तालुक्यातील ३९ शेतकऱ्यांचे धान पीक ‘सॉलिड’ या कीडनाशकाच्या दुष्परिणामामुळे धान पीक मोठ्या प्रमाणात खरपटून गेले असल्याची तक्रार राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती.आ.मुनगंटीवार यांनी याची गंभीर दखल घेत तत्काळ चौकशीचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिल्यानंतर आयपीएल कंपनीकडून तब्बल ३० लाख ९७ हजार ८०० रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. याबद्दल आ. मुनगंटीवार यांचे शेतकरी बांधवांनी आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

 मुल आणि पोंभूर्णा परिसरातील शेतकऱ्यांनी धान पिकावर फवारण्यात आलेल्या ‘सॉलिड’ या कीडनाशकांच्या दुष्परिणामामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची तक्रार आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. मुल तालुक्यातील सिंतळा, भेजगाव येथील ३१ शेतकरी आणि पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील ८ शेतकरी अशा एकूण ३९ शेतकऱ्यांचे धान पीक औषधाच्या प्रतिकूल परिणामामुळे खरपटून गेले होते, तसेच धानाचे लोंब अजिबात न आल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आयपीएल कंपनीची ही औषधे संबंधित शेतकऱ्यांनी सिंतळा येथील कृषी केंद्रातून खरेदी केली होती.

ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना चौकशी करण्याचे आणि संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर कृषी विभागाने तातडीने पंचनामे, नमुना चाचण्या आणि अहवाल प्रक्रिया पूर्ण केली.

त्या अनुषंगाने, आयपीएल कंपनीकडून मुल तालुक्यातील ३१ शेतकऱ्यांना मिळून २२ लाख ५४ हजार ८०० रुपये, तर पोंभूर्णा येथील ८ शेतकऱ्यांना ८ लाख ४३ हजार रुपये अशी एकूण ३० लाख ९७ हजार ८०० रुपयांची नुकसान भरपाई तात्काळ मंजूर करत,धनादेशाचे वितरण करण्यात आले.

या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुल व पोंभूर्णा परिसरातील शेतकरी बांधवांना न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये