ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जामनी येथे मनिकगड सिमेंट वर्क्सच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन

61 नागरिकांनी घेतला लाभ 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदुर येथून जवळच असलेल्या जामनी गावात मनिकगड सिमेंट वर्क्सच्या सी एस आर अंतर्गत एकदिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले, ज्यामध्ये एकूण 61 लाभार्थ्यांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला.

शिबिरात मेडिकल टीमने हीमोग्लोबिन तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी तसेच इतर सामान्य आरोग्य तपासण्या केल्या. यासोबतच स्तनपान करणाऱ्या मातांची आणि गर्भवती महिलांची विशेष तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शनही देण्यात आले.

मनिकगड सिमेंट वर्क्सच्या मेडिकल टीमने सर्व रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषधे आणि उपचार उपलब्ध करून दिले. ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराचे कौतुक करत कंपनीने राबविलेल्या आरोग्यविषयक उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.

हे आरोग्य शिबिर ग्रामीण भागातील आरोग्य जागरूकता वाढविणे आणि प्राथमिक आरोग्य सेवा सुलभ करणे या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.

लोकांच्या हिताचे आरोग्य शिबीर आम्ही नेहमी आजूबाजूच्या गांवात राबवू असे प्रतिपादन माणिकगढ चे वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश गहलोत यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये