ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महावितरणच्या गडचांदूर उप विभागाचे विभाजन करा

ओम पवार यांची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 कोरपना :_ महावितरणच्या गडचांदूर उपविभागाचा वाढता व्याप व विस्तार लक्षात घेता. या उपविभागाचे विभाजन करून उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग कार्यालय,कोरपना येथे कार्यान्वित करण्यात यावे.

या मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार यांनी आमदार देवराव भोंगळे यांना निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ च्या गडचांदूर उप विभागाचे कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत संपूर्ण कोरपना तालुका, राजुरा व जिवती तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. त्यामुळे या उपविभागाचे कार्यक्षेत्र १४० हून अधिक गावाचे असून ३६ हजार हून अधिक वीज ग्राहक आहे. कोरपना तालुक्यातील तेलंगाना सीमेवरील शेवटच्या गावापासून गडचांदूर चे अंतर ४२ किलोमीटर हून अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना उपविभागासंबंधी विविध कामासाठी गडचांदूर येथे जाणे येणे यात वेळ व आर्थिक भुर्दड अधिकची सहन करावी लागत आहे.

या दृष्टीने कोरपना या तालुका स्थानी नवीन उपकार्यकारी अभियंता, उपविभाग येथे स्थापन झाल्यास कोरपना सह वनसडी, पारडी, कोडशी बूज, नारंडा व जिवती तालुक्यातील धनकदेवी परिसरातील ग्रामस्थांना सोयीचे व सुविधा जनक होईल.असे निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये