ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निराधार, वयोवृद्ध व विधवा यांची बँकेत व तहसिल कार्यालयात गर्दी

आधार कार्ड व बँक पासबुक पडताळणीच्या कामासाठी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यात गावे,पाढे गुढे मिळून ११० गावे आहेत, या तालुक्याची लोकसंख्या ६७,६०० आहे. वयोवृद्ध वयस्कर, निराधार विधवा या महिलांचे शासनाकडून मिळणारे मानधन पडताळणी न केल्यास बंद होणार असल्याचे माहिती सामान्य नागरिकांना मिळाल्यामुळे आज तहसील कार्यालय व बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी झालेली आहे.

अनेक गावातून वयोवृद्ध वयस्कर, निराधार,विधवा हे ऑटो व चारचाकी वाहने किरायाने करून जिवती येथे आलेले आहे त्यामुळे आज जिवती शहराला यात्रेचे स्वरूप आलेले आहे पावसाळ्यात पेरणीचे शेतातील मशागतीचे कामे सुरू असताना एकीकडे शेतकऱ्यांना मजुरीसाठी माणसे मिळत नाहीत तर दुसरीकडे ज्यांना मुलांचा व इतरांचा आधार नाही अशा निराधार वयोवृद्ध वयस्कर विधवा महिलाने गावातूनच मिळेल ते साधने वाहने यांनी येऊन आधार कार्ड बँक पासबुक हे संबंधित कार्यालयाला देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे तेव्हा संबंधित महसूल विभागाचे प्रत्येक महसुली गावात तलाठी साजे असल्याने त्याच तलाठ्याकडून तर काही गावात ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक असल्याने हे प्रशासनाचे कर्मचारी असल्याने त्यांच्याकडेच ही कागदपत्रे जमा करून ती कागदपत्रे संबंधित संजय गांधी निराधार योजना विभागाला द्यावे व होणारी लोकांची गैरसोय येण्या-जाण्याचा आर्थिक भुर्दंड व नाहक त्रास होऊ नये यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

या निवेदनात प्रा. सुग्रीव गोतावळे माजी सभापती, विजयकुमार कांबळे,सिताराम मडावी, मारुती मोरे, अशपाक भाई शेख, सुनील शेळके, रामभाऊ चव्हाण, भारत कांबळे, गायकवाड सौ. चतुराबाई मोरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावर तहसीलदार काय कारवाई करतील व नागरिकांना होणाऱ्या समस्येवर काही तोडगा काढतील का याकडे सर्व तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये