महाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांकडून बिएलओचे कामे काढा

तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची भद्रावती तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट :अतुल कोल्हे भद्रावती –

नुकतीच शैक्षणिक सत्राची सुरुवात होवून शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आपल्या कार्याला लागला. अशातच ईतर विभागातील कर्मचारी ऐवजी प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या बिएलओ म्हणून तहसील कार्यालय वतीने लावण्यात आल्यामुळें शैक्षणिक कार्य करावे की, मतदार यादी दुरुस्तीचे अशा द्विधा स्थितीत शिक्षकांची अवस्था झाली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांकडून बिएलओचे काम काढावे . या करता – तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने तहसीलदारांना निवेदन दिले. कोरोना कालावधीत मागे असणारे व नवप्रवेशित विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन होण्यासाठी शासन सेतू अभ्यास उपक्रम राबवत आहे व तो वीस दिवसाचा उपक्रम सर्व शिक्षकांना घेणे अनिवार्य आहे तसेच शिक्षकांचा पूर्ण वेळ शालेय कामकाजात जाणे गरजेचे आहे. शासन परिपत्रक:आरटीई २०१३/प्र.क्र. १३२/प्राशि-१दि. ३/ ५/२०१३ नुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शिक्षकांच्या सेवा सार्वत्रिक निवडणूकीची मतदान प्रक्रिया वगळता इतर प्रयोजनार्थ वापरु नये असे स्पष्ट राज्य शासनाचे निर्देश आहेत. तसेच संबंधित बाब घडत असल्यास संबंधित प्रशासन अधिकारी यांचे विरुद्ध प्रशासकीय कारवाईची नोंद आहे. सर्व क्षेत्रिय अधिकार्यांनी उपरोक्त सूचनांचे पालन करण्याचे निर्देश आहे. सध्या प्रत्येक तालुक्यात मंजूर पदापेक्षा कमी शिक्षक कार्यरत असून काही शाळांत एकाच शिक्षकांकडे दोन किंवा चार चे वर वर्गाची जबाबदारी असल्याने पूर्ण मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कामे देवू नये अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार अनिकेत सोनवणे यांना शिक्षक संघटना समन्वय समिती भद्रावतीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी निमंत्रक अजय बोंडे, सहनिमंत्रक प्रविण थेरकर, संयोजक शंकर मिरे, प्रविण ताजणे, धम्मपाल गावंडे, किशोर चंदनखेडे, शंकर नळे, विलास मेश्राम, ताराचंद शेंडे, प्रेमदास तुमराम, दिलीप आस्वले व ईतर शिक्षक उपस्थित होत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये