ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होली फॅमिली कॉन्व्हेन्ट स्कूल येथे वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :- होली फॅमिली कॉन्व्हेन्ट स्कूल थूट्रा , गडचांदूर येथे इको क्लब च्या वतीने वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले, विज्ञान विभाग प्रमुख नाझिया अली मॅडम यांनी वृक्षाचे पर्यावरणातील महत्त्व , हवामान बदलावर नियंत्रण, आणि हरित पर्यावरण निर्मिती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, शाळेच्या मुख्याध्यापीका सिस्टर दिपा, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात विविध वृक्षांचे वृक्षारोपण केले, यावेळी इको क्लब प्रमुख सतीश भगत , आणि विद्यार्थांनी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची आणि पर्यावरण संरक्षण साठी सदैव कार्यरत राहण्याची शपथ घेतली, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयी जागरुकता निर्माण झाली आणि निसर्ग प्रेमाची भावना अधिक दृढ झाली, आज एक झाड लावू या, उद्याचे भविष्य हिरवेगार बनवू या , हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये