लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
शनिवार दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम माननीय मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली ,प्रमुख अतिथी उपमुख्याध्यापक श्री. राजपुरोहित सर , प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक श्री. पिंपळशेंडे सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी वर्ग आठ ते बारावीच्या इच्छुक विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
कु. भाग्यश्री जगताप, रौनक गेडाम, कुमारी पलक दिवटेलवार ,अनुप शंभरकर,क्रिश कुरवटकर,प्रशांत पिंपळकर,करण तडसे,सक्षम बेले,आर्यन वाकडे ,अनिकेत निंभोरकर, अंश पोर्टे,नक्ष पोर्टे, तेजस राजूरकर, अरहान शेख, कु .अश्विनी डोंगरे, कुमारी नंदिनी रामटेके,कु.प्रांजली सोनवणे,आयुष राऊत,यश कोवे, कुमारी आस्था हजारे, कुमारी अक्षरा मोडक इत्यादी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. वर्ग नववी अ व वर्ग आठ ब च्या विद्यार्थिनींनी समूहगीत सादर केले. या गीतांमध्ये कुमारी अश्विनी कांबळे, कुमारी ज्योती टिपले, कुमारी प्राची नैताम, कुमारी अरमीन कुरेशी, कुमारी लावण्या कोवे,कुमारीभाग्यश्री जगताप कुमारी पलक दिवटेलवार यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक प्राध्यापक पिंपळशेंडे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंग कथन केले. विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणावे. विद्यार्थ्यांनी नियमितअभ्यास करावा, असे प्रतिपादन केले.
यानंतर सकाळी लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करण्यात आला .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार प्रदर्शन श्री कार्तिक चरडे सर यांनी केले.



