ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एमएसपीएम ग्रुपचे अध्यक्ष श्री.पी एस. आंबटकर यांचा वाढदिवस साजरा 

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या विदर्भातील शिक्षण क्षेत्रात यशाची भरारी घेणारी संस्था म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळचे नाव सन्मानाने घेतले जाते, संस्थापक श्री.पी. एस. आंबटकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

MSPM ग्रुपचे प्राचार्य त्यांचा बद्धल कौतुक करीत असताना आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील, नव्या स्वप्ननाचा बहर येऊ दे, इच्छा, आकांक्षा उंच-उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे, दर्जेदार शिक्षणासह सामाजिक बांधिलकीतुन या संस्थेचा जन्म झाला, तसेच त्यांचे सुपुत्र उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर आणि पत्नी अंकिता पियुष आंबटकर, तसेच मुलगी डॉ. पायल पी. आंबटकर यांच्या सोबतीने जिद्ध आणि संस्थेविषयी असेलेली आस्था यामुळे हे शक्य झालेले आहे, या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना, चंद्रपूर जिल्ह्यातून दर्जेदार आणि मूल्यवर्धित शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या करियरसाठी नवी दारे उघडली आहेत ते नेहमी यशस्वी व्हावे अशी कामना केली.

तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.पी एस. आंबटकर यांना आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई भवानी चरणी प्रार्थना केली, तसेच यांना पुष्पगुच्छ देऊन आपल्याला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा देत परमेश्वर आपल्याला दीर्घायु देवो व असेच कायम सगळ्यांचे आशीर्वाद व प्रेम मिळत राहो हीच सदिच्छा दिल्या, तसेच ते नेहमी यशस्वी व्हावे आणि शिक्षण क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी अशी कामना करीत MSPM ग्रुपच्या सर्व प्राचार्य आणि सर्व शिक्षक, शिक्षकेत्तरी गण यांनी सदिच्छा दिल्या.

तसेच कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक पी. एस. आंबटकर, सचिव प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, डायरेक्टर  अंकिता पियुष आंबटकर, तसेच, प्राचार्य शोभना मॅडम, प्राचार्य फैय्याज सर, प्राचार्य राजदा सिद्धंकी मॅडम, प्राचार्य जमीर शेख सर, डॉ. शीतल कोलपाकवार मॅडम, डॉ. हजारे सर, प्राचार्य लियाकत शेख सर, प्राचार्य प्रसाद निब्रड सर, प्राचार्य प्रकाश पिंपळकर सर, डॉ. जगदीश सर, उपप्राचार्य अनिल खुजे सर, प्राचार्य अमित जोगे सर, रजिस्टर बिसन सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये