ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध्यरित्या गांजा मालाची विक्री करताना आरोपीला केली अटक

पोलीस स्टेशन वर्धा शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कामगीरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 04.12.2025 रोजी पोलीसांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून एन.डि.पी.स. कायदयातील तरतुदीनुसार छापा घातला असता आरोपी नामे सुरज श्याम गौतम वय 35 वर्ष रा. शितला माता मंदीर जवळ, ईतवारा बाजार, वर्धा हा आपले राहते घरी अवैध्यरित्या गांजा अंमली पदार्थ बागळत असतांना मिळून आल्याने पोलीसांनी त्यास अटक केली. दिनांक 04.12.2025 रोजी दुपारचे सुमारास वर्धा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहीतीवरून त्यांनी पोलीस निरीक्षक संतोष ताले यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे पंच, मापारी, फॉरेसिंक पथक व पोलीस स्टॉफसह शितला माता मंदीर जवळ, ईतवारा बाजार, वर्धा येथे आरोपीच्या राहते घरी तपासणी केली असता घर झडतीमध्ये 3 किलो 623 ग्रॅम निव्वळ गांजा अंमली पदार्थ, एक छोटा इलेक्ट्रीक वजनकाटा, किरकोळ विक्रीकरीता गांजा अंमली पदार्थ भरण्यासाठी वापरत असलेल्या छोटया प्लास्टीक पन्नी असा एकुण जु.कि. 73500 रु चा मुद्देमाल जप्त केला.

हि कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्म, शैलेश चाफलेकर, अभिजीत वाघमारे, विजय पंचटिके, महेद्र पाटील, रंजीत भुरसे, नितीन इटकरे, अश्पाक शेख, मिना माहींदे, अक्षया सावळकर, यांनी केली त्यामुळे शहर परीसरात अवैध्य अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींवर प्रतीबंध करण्यास पोलीसांना यश मिळाले.या गुन्हयात अटक केलेल्या आरोपीवर यापुर्वी सुद्धा वेगवेगळ्या कलमाअन्वये भरपुर गुन्हे नोंद असल्याबाबत माहीती मिळाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये