ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा!

तहसीलदार व संबंधित विभागांना निवेदने 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- यावर्षी जिवती तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यातील रस्त्यावर खड्डे निर्माण झालेले आहेत. टेकामांडवा, चिखली, कुंभेझरी,पुडीयालमोहदा, मुकदमगुडा, कोठा, येल्लापूर, तसेच जिवती ते गडचांदूर या मार्गावर अनेक अपघात होऊन सामान्य नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला आहे.तर काहींना कायमचे अपगंत्व आले आहे. पाटागुडा,चिखली कुंभेझरी, व अन्य पुलावर रॉड उभे झाल्यामुळे वाहनांसाठी धोक्याचे झाले आहे.त्यामुळे तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना अनेकदा निवेदने, पत्रे दिलेले आहेत.

परंतु बांधकाम विभागाने अजून पर्यंत कुठलेही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतलेले नसल्यामुळे जिवती येथील तहसीलदार रूपाली मोगरकर यांना निवेदन देऊन सात दिवसाच्या आत जर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नसेल तर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे आशयाचे निवेदन दिलेले आहे त्या अनुषंगाने तहसीलदार व पोलीस स्टेशन यांनाही या संदर्भातली माहिती देऊन यातून मार्ग काढावा असे पत्र सुद्धा दिलेले आहेत. जर संबंधित विभागाने या संदर्भात ठोस पावले उचलले नाहीत तर ७ डिसेंबर २५ पासून तहसील कार्यालयावर मोठे आंदोलन करण्यात येईल. व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील. असे शिष्टमंडळाने तहसीलदार यांना कळविले आहे.

या शिष्टमंडळात सुग्रीव गोतावळे, दत्ता तोगरे, भगवान डुकरे, बाळू पतंगे, बाळू मस्के, राजकुमार गोपले, जब्बार भाई, लक्ष्मण कोडापे, सुरेश कोडापे, ज्ञानेश्वर पवार, गोविंद दुबले, रोहिदास राठोड व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर संबंधित विभाग किती गांभीर्याने लक्ष देऊन निर्णय घेतील याकडे तालुक्याचे जनतेचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये