गणेशमोड येथे आज उसळला भाविकांचा जनसागर
श्री दत्त जयंती उत्सव ; साडेतीन दशकापासूनची यात्रा परंपरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :- ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या गणेशमोड येथील श्रीदत्त मंदिर येथे श्री दत्त जयंती उत्सवाला बुधवार दिनांक ३ पासून प्रारंभ झाला. या तीन दिवसीय उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दिनांक ४ रोजी श्री दत्त जयंतीच्या औचित्यावर सकाळी साडेपाच वाजता सामुदायिक प्रार्थना तदनंतर लगेच आरती व पूजा पाठ, सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी ह. भ. प विठ्ठल महाराज डाखरे यांचे काल्याचे किर्तन, दहीहंडी काला स्वामी चैतन्य महाराज वढा यांचे शुभ हस्ते, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, वास्तु विशारद बापूजी धोटे यांचा सत्कार सोहळा, सायंकाळी ५ वाजून तीस मिनिटांनी सामुदायिक प्रार्थना, शुक्रवार दिनांक ५ रोजी सकाळी साडेपाच वाजता सामुदायिक ध्यान व आरती, पूजा पाठ, दुपारी ११ वाजून १५ मिनिटांनी ह.भ.प जाधव महाराज, ह.भ.प गुरनुले महाराज, ह.भ.प किनाके महाराज, ह.भ.प मीनाथ महाराज, ह. भ. प. भेंडाळे महाराज यांचे किर्तन पर प्रबोधन, सव्वा पाच वाजता सामुदायिक प्रार्थना अशी कार्यक्रमाची रूपरेषा राहणार आहे. यादरम्यान भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या उत्सवास उपस्थिती दर्शवावी असे आवाहन श्री. दत्त संस्थानचे अध्यक्ष वसंत मडावी, उपाध्यक्ष शशिकांत आडकिने, सचिव डॉ. अरुण ठाकरे, सहसचिव दिलीप जेनेकर, कोषाध्यक्ष घनश्याम नांदेकर, विश्वस्त देवाजी हुलके, सुभाष वडस्कर, गजानन खामनकर, पुंडलिक उलमाले, विठ्ठल पिंपळकर यांनी केले आहे.
देवस्थानाचे महात्म्य ….
पुरातन काळापासून ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या गणेशमोड व देवघाट या जुळ्या आज रिठ स्वरूपात उरलेल्या स्थानी देवघाट नाल्यावरील पुलाचे पायव्याचे खोदकाम करताना कार्यरत मजुरांना त्रिमूखी दत्तदेवतेची मूर्ती आढळून आली. त्यानंतर लोकसहभागातून तिची विधीवत स्थापना करण्यात आली. त्यानंतर काही वर्षानंतर यात्रेला सुद्धा प्रारंभ करण्यात आला.
आज या उत्सवाला महाराष्ट्र सह तेलंगणातील भाविक मोठ्या संख्येने दर्शणार्थी येतात.



